सुनील कांबळे
Appearance
(सुनिल ज्ञानदेव कांबळे या पानावरून पुनर्निर्देशित)
सुनील ज्ञानदेव कांबळे हे भारतीय राजकारणी आहेत. हे २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे सदस्य म्हणून पुणे कॅन्टोन्मेंटमधून महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले. हे १९९२पासून पुणे महापालिकेत नगरसेवक होते. यांची मार्च २०१९मध्ये त्यांची पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते.. भाजप मंत्री दिलीप कांबळे यांचे ते धाकटे भाऊ आहेत. यांनी अभाविपमध्ये आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यांनी पश्चिम बंगालच्या २०२१ च्या निवडणुकीत बालूरघाट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचार आणि बूथ स्तरावर संपर्क साधण्याचे भाजपच्या बाजूने काम केले. कांबळे हे सध्या महाराष्ट्र विधिमंडळातील अनुसूचित जाती विधी समितीचे सदस्य आहेत. [१] [२] [३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Kamble Sunil Dnyandev(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- PUNE CANTONMENT (SC)(PUNE) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2020-04-12 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra election result winners full list: Names of winning candidates of BJP, Congress, Shiv Sena, NCP". India Today (इंग्रजी भाषेत). October 24, 2019. 2020-04-12 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra election results: Full list of winners from BJP, Shiv Sena, Congress, NCP". International Business Times, India Edition (इंग्रजी भाषेत). 2019-10-25. 2020-04-12 रोजी पाहिले.