Jump to content

सुदर्शन पटनायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुदर्शन पटनायक

सुदर्शन पटनायक हे पुरी, ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वालुका शिल्पकार आहेत.जगन्नाथपुरीला राहणा-या एका मध्यमवर्गीय, धार्मिक कुटुंबामधे १५ एप्रिल १९७७ मध्ये त्याचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण चालू असतांना त्यांना काही घरगुती कारणांमुळे पुढे शिक्षण घेता आले नाही. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांनी पुरीच्या समुद्रकिना-यावर वाळुंच्या कणांतून त्यांनी विविध वालुकामुर्ती घडविल्या. काही क्षणाच्या असलेल्या या सुंदर कलेतून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट वाळुशिल्पकार हा किताब त्यांना २००८ मध्ये त्यांच्या पदार्पणातच मिळाला. कलेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळत गेल्यानंतर वाळुशिल्पात त्यांचा दबदबा निर्माण झाला. रशियाच्या समुद्रकिना-यावर बनवलेल्या त्याच्या कलाकृतीला पिपल्स चॉईस हा पुरस्कार मिळाला. पुढे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळत गेली. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी आतापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे.ओरिया बंगाली हिंदी इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले. सँड इंडिया डॉट कॉमच्या माध्यमातून जगभरातील कलाकारांशी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. []

हेही पाहा

[संपादन]
  1. ^ [१].www.misalpav.com/node/20727