सुंदर पिचई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुंदर पिचई तथा पिचई सुंदरराजन (जन्म : चेन्नई, १२ जुलै, इ.स. १९७२ - ) हे भारतीय वंशाचे उद्योगपती व गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. हे मुळचे तमिळनाडूचे रहिवासी असून त्यांनी खडगपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (IITतून)धातुशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.

भारतातील खडगपूर येथून बी.टेक. झाल्यावर सुंदरराजन पिचई यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एम.एस. व युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या व्हार्टन स्कूलमधून एम.बी.ए. केले.

सुंदर २००४ साली गुगल कंपनीत नोकरीला लागले. गुगलच्या गुगल ड्राइव्ह, गुगल क्रोम आणि क्रोम ऑपरेटिंग सिस्टिमच्या निर्मितीची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्यामुळे अवघ्या ११ वर्षांच्या सेवेनंतर, त्यांच्यावर गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जबाबगारी सोपवण्यात आली.. (१० ऑगस्ट २०१५)

सुंदर पिचई यांच्यावरील मराठी पुस्तके[संपादन]