सिंफनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंफनी ही पश्चिमात्य शास्त्रीय संगीतामधील एक विशिष्ट रचना आहे. सिंफनी कायम ऑर्केस्ट्रॉमार्फत वाजवली जाते. अनेक सिंफनींमध्ये चार लयी असतात.

१७व्या शतकात सुरुवात झालेल्या सिंफनी अठराव्या शतकात लोकप्रिय होऊ लागल्या. युरोपामध्ये व्हियेनामानहाइम येथे रचल्या गेल्या. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जोसेफ हायडनमोझार्ट हे सर्वोत्कृष्ट सिंफनी निर्माते होते. हायडनने ३६ वर्षांच्या कारकिर्दीत १०८ तर मोझार्टने २४ वर्षांच्या कालखंडात ५६ सिंफनी रचनांची निर्मिती केली. १९व्या शतकात बीथोव्हेनने सिंफनीची लोकप्रियता अत्युच्च शिखरावर नेली. त्याने सिंफनीमध्ये अनेक बदल केले. त्याची सिंफनी क्रमांक ५ ही आजवर जगातील सर्वात लोकप्रिय सिंफनी मानली जाते. अंतोनिन द्वोराक, एक्तॉर बर्लियोझप्यॉतर इल्यिच त्चैकोव्स्की हे देखील १९व्या शतकामधील लोकप्रिय सिंफनीकार होते.


ध्वनिमुद्रणे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

बाह्य दुवे[संपादन]