Jump to content

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैश्विक लसीकरण कार्यक्रम हा भारत सरकारने १९८५ मध्ये सुरू केलेला लसीकरण कार्यक्रम आहे. १९९२ मध्ये हा बाल अस्तित्व आणि सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाचा एक भाग बनला आणि २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) हा एक महत्त्वाचा भाग आहे.[१] यालाच सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम किंवा नियमित लसीकरण कार्यक्रम असेही म्हणतात.

समाविष्ट असलेल्या लसी

[संपादन]

या कार्यक्रमात आता क्षयरोग, डिप्थीरिया, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओमायलाईटिस, गोवर, हिपॅटायटीस बी, अतिसार, जपानी एन्सेफलायटीस, रुबेला, न्यूमोनिया (हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप बी) आणि न्यूमोकोकल रोग (न्यूमोकोकल आणि न्युमोनिया आणि मेंदूज्वराचे लसीकरण) समाविष्ट आहे. हिपॅटायटीस बी आणि न्यूमोकोकल रोग अनुक्रमे २००७ आणि २०१७ मध्ये जोडले गेले.

यूआयपीमध्ये समावेश झालेल्या इतर रोगांच्या लसी म्हणजे निष्क्रिय पोलिओ लस (आयपीव्ही), रोटाव्हायरस लस (आरव्हीव्ही), गोवर-रुबेला लस (एमआर). देशातील वैश्विक लसीकरण कार्यक्रमात (यूआयपी) चार नवीन लसी आणल्या गेल्या आहेत, ज्यात इंजेक्टेबल पोलिओ लस, जपानी एन्सेफलायटीस आणि न्यूमोकोकल कन्जुगेट लस यासाठी प्रौढांच्या लसींचादेखील समावेश आहे.[१]

रोटा विषाणू, रूबेला आणि पोलिओ (इंजेक्टेबल) या लसी देशाला सहस्रक विकास उद्दिष्टातील ४ उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करतील. या उद्दिष्टांमध्ये २०१५ पर्यंत बालमृत्यू दर दोन-तृतीयांशने कमी करणे, तसेच जागतिक स्तरावर पोलिओ निर्मूलनाचे लक्ष्य गाठणे समाविष्ट आहे. जपानी एन्सेफलायटीस विरुद्ध प्रौढांची लसदेखील हा रोग मोठ्या प्रमाणावर असलेल्या जिल्ह्यांमध्ये लागू केली जाईल. देशातील लसीकरणविषयक सर्वोच्च वैज्ञानिक सल्लागार संस्था, नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑफ इंडियाने (एनटीएटीआय) असंख्य वैज्ञानिक अभ्यास आणि सर्वसमावेशक विचारविनिमयानंतर या नवीन लसी लागू करण्याच्या शिफारसी केल्या आहेत.

या नवीन लसींच्या सहाय्याने आता भारताचा वैश्विक लसीकरण कार्यक्रम (युआयपी) दरवर्षी २.७ कोटी दशलक्ष बालकांना ३ रोगांविरुद्ध विनामूल्य लस प्रदान करेल. पेंटाव्हॅलेंट लस समाविष्ट करण्याच्या ताज्या निर्णयामुळे सुमारे एक लाख शिशु आणि प्रौढ लोकांचा मृत्यू रोखण्यास मदत होईल आणि या रोगांमुळे दरवर्षी सुमारे १० लाख व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले जाते, ते टाळले जाईल.

“चार नवीन जीवनरक्षक लसींचा समावेश, देशातील बालपण आणि बालमृत्यू आणि विकृती कमी करण्यात महत्त्वाची  भूमिका बजावेल. यापैकी अनेक लसी आधीच खाजगी प्रॅक्टिशनर्सच्या माध्यमातून ज्यांना परवडतील त्यांना उपलब्ध आहेत. सामाजिक आणि आर्थिक स्थिती विचारात न घेता लसीकरणाचे फायदे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचतील हे आता सरकार सुनिश्चित करेल", असे पंतप्रधान म्हणाले.[२]

फेब्रुवारी २०१७ पासून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यूआयपीमध्ये गोवर-रुबेला लस आणली.[३]


लसीकरण सेवा उपलब्ध असलेली ठिकाणे

[संपादन]

लसीकरण सेवा खालील ठिकाणी उपलब्ध असतात.[४]

 • प्राथमिक आरोग्य केंद्रे
 • ग्रामीण रुग्णालये
 • नगरपालिका दवाखाने
 • उपजिल्हा रुग्णालये
 • जिल्हा रुग्णालये
 • महानगरपालिका रुग्णालये
 • वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये
 • धर्मादाय व स्वयंसेवी रुग्णालये

संदर्भ

[संपादन]
 1. ^ "Shri J P Nadda launches Pneumococcal Conjugate Vaccine (PCV) under Universal Immunization Programme (UIP)". pib.gov.in. 2019-11-27 रोजी पाहिले.
 2. ^ PTI. "Govt adds 4 vaccines to immunisation programme". https://www.livemint.com (इंग्रजी भाषेत). 2019-11-27 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
 3. ^ "Measles-rubella vaccine to roll out in February". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-11-27 रोजी पाहिले.
 4. ^ "नियमित लसीकरण कार्यक्रम". राज्य शासन आरोग्य विभाग. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले.