साधना आमटे
साधना आमटे | |
---|---|
टोपणनाव: | इंदू |
जन्म: | ५ मे, १९२७ नागपूर |
मृत्यू: | ९ जुलै, २०११ आनंदवन, चंद्रपूर जिल्हा |
पत्रकारिता/ लेखन: | समिधा (आत्मचरित्र) |
प्रमुख स्मारके: | "श्रद्धावन" |
धर्म: | हिंदू |
वडील: | कृष्णशास्त्री घुले |
पती: | मुरलीधर देवीदास आमटे |
अपत्ये: | प्रकाश आमटे, विकास आमटे |
साधना आमटे (५ मे, १९२७ [१] - ९ जुलै, २०११; आनंदवन, चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र) या मराठी समाजसेविका होत्या. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन आश्रमाच्या उभारणीत व व्यवस्थापनात पती मुरलीधर देवीदास आमटे यांच्यासह त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
जीवन
[संपादन]नागपूरच्या महालातील वैदिक परंपरा असलेल्या घुले घराण्यात साधना आमट्यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव इंदू असे होते. इंटरपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. मुरलीधर देवीदास आमटे, अर्थात बाबा आमटे, यांच्याशी त्यांचे प्रेम जुळले व त्यातून ८ डिसेंबर, इ.स. १९४६ रोजी दोघे विवाहबद्ध झाले[१].
साधनाताई आमटे यांचे ९-११-२०११ रोजी निधन झाले. त्यांचे पुत्र प्रकाश आमटे यांनी साधनाताईंचे कार्य पुढे चालू ठेवले आहे,
आत्मचरित्र
[संपादन]साधना आमट्यांचे 'समिधा' या नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले असून त्यात, त्यांच्या व बाबा आमट्यांच्या सहजीवनाची वाटचाल कथन केली आहे. हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी आहे .
पुरस्कार
[संपादन]साधना आमटे यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या २००७ सालच्या चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
संदर्भ
[संपादन]- ^ a b रवींद्र जुनारकर, पंकज मोहरीर. "साधनाताई आमटे यांचे निधन". 2011-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)