सांता ॲना, कॅलिफोर्निया
Jump to navigation
Jump to search
हा लेख कॅलिफोर्नियातील सांता ॲना शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सांता आना (निःसंदिग्धीकरण).
सांता ॲना हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. ऑरेंज काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११मध्ये ३,२९,४२७ होती. हे शहर लॉस एंजेलस महानगराचा भाग आहे.
वाहतूक[संपादन]
जॉन वेन विमानतळ तथा सांता ॲना विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. येथील रेल्वे स्थानकावरून स्थानिक व लांबच्या पल्ल्याच्या अनेक गाड्या सुटतात. पॅसिफिक कोस्टलायनर ही सान डियेगो आणि लॉस एंजेलस/पासो रोब्लेस दरम्यानची रेल्वे सेवा येथून उपलब्ध आहे. सांता ॲनामधून आय-५, आय-४०५, कॅलिफोर्निया २२, कॅलिफोर्निया ५५, कॅलिफोर्निया ९१ सह अनेक महामार्ग जातात.