सांग्शाकची लढाई
Appearance
सांग्शाकची लढाई तथा शांग्शाकची लढाई ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी सेना आणि ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये उ-गो मोहिमेअंतर्गत झालेली लढाई होती. या युद्धात भारतीय भूमीवर लढली गेलेली ही पहिलीच लढाई असून जपान्यांनी ब्रिटिशांना शांग्शाकच्या आसपासच्या प्रदेशातून हुसकून लावले. या घनघोर लढाईत ६५२ ब्रिटिश व भारतीय तर ४००पेक्षा अधिक जपानी असे १,०००पेक्षा जास्त सैनिक मृत्युमुखी पडले.
संख्याबळात कमी असलेले जपानी सैन्य ही लढाई जिंकले असले तरी त्यांचीही मोठी जीवितहानी झाली आणि येथे लढत राहिल्याने कोहिमाला जाणारा रस्ता त्यांना वेळीच रोखता आला नाही. त्याकारणे ब्रिटिश सैन्य कोहिमा येथे दाखल झाले व नंतर झालेल्या कोहिमाच्या लढाईत जपान्यांना हरवणे त्यांना शक्य झाले.