शांग्शाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सांग्शाक किंवा शांग्शाक हे भारताच्या मणिपूर राज्यातील दोन गावांना दिले गेलेले नाव आहे. शांग्शाक खुलेन आणि शांग्शाक खुनौ ही दोन गावे राष्ट्रीय महामार्ग १५०वर उख्रुल शहराच्या दक्षिणेस १५ किमी वर आहेत. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०२५ होती.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान मार्च १९४४मध्ये भारतीय भूमिवरील पहिली लढाई येथे झाले. ऑपरेशन उ-गो तहत जपानी सैन्य व ब्रिटिश भारतीय सैन्यात झालेल्या या घनघोर लढाईत शेकडो सैनिक मृत्युमुखी पडले होते.