Jump to content

सहावा चामराज वोडेयार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सहावा चामराज वडियार या पानावरून पुनर्निर्देशित)
सहावा चामराज वोडेयार
मैसुरुचा १०वा राजा
अधिकारकाळ १६१७-१६३७
अधिकारारोहण १६१७
राज्याभिषेक १६१७
राजधानी मैसुरु
पदव्या महा मंडलेश्वर बिरुद-अंतेम्बरा-गंदा बेट्टाडा चामराज वोडेयार
जन्म २१ एप्रिल, १६०३
मृत्यू २ मे, १६३७
पूर्वाधिकारी पहिला राज वोडेयार
' दुसरा राज वोडेयार
उत्तराधिकारी दुसरा राज वोडेयार
वडील युवराज नरसराज वोडेयार
राजघराणे वडियार घराणे
धर्म हिंदू

सहावा चामराजा वोडेयार (२१ एप्रिल, १६०३ - २ मे, १६३७) हा मैसुरुचा दहावा राजा होता. हा आपले आजोबा पहिल्या राज वोडेयारच्या मृत्यूनंतर सिंहासनावर आला.

विजयनगर साम्राज्याचा नाश

[संपादन]

सहाव्या चामराजाच्या कारकीर्दीत विजयनगर साम्राज्याचा नायनाट झाला. बहमनी सल्तनतीसह इतर दख्खनी सल्तनतींनी राजधानी हंपीचा नाश करून साम्राज्याचे लचके तोडून घेतले. या धामधूमीत चामराजाने आपले राज्य झपाट्याने विस्तारले. त्याच्या कारकीर्दीच्या अखेरीस त्याने आपल्या राज्याचा आकार जवळजवळ दुप्पट केला होता.

त्याच्या मृत्यूनंतर त्याचे काका,दुसरा राज वोडेयार सिंहासनावर बसले.