ससाणा
Appearance
- हेसुद्धा पाहा: छोटा बहिरी ससाणा आणि बहिरी ससाणा
ससाणा, पिन टूपली, बहिरी ससाणा याला इंग्रजीमध्ये Indian sparrow hawk असे म्हणतात. हिंदीमध्ये गौरेया, बाशा, चिडी बाज, वाशिन अशी नावे आहेत. हा एक शिकारी पक्षी आहे.
ओळख
[संपादन]हा आकाराने कावळ्यापेक्षा थोडा मोठा असतो. याच्या वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी असतो. पोटाखालचा रंग पांढरा, छाती व पोटावर तांबूस रंगाचे जवळ जवळ असलेले पट्टे, पिवळे डोके, गालावर तांबूस चट्टा असे नर ससाणाचे वर्णन आहे. तर मादी ससाणाचे वर्णन वेगळे आहे . मादीच्या वरील भागाचा रंग गडद तपकिरी व छाती आणि पोट पांढरे व त्यावर गडद करड्या तांबूस रंगाचे जवळ जवळ पट्टे असतात. गालावर पट्टे नसतात, पण शेपटीवर गडद रंगाचे पट्टे असतात.
आढळ
[संपादन]हे पक्षी साधारणपणे हिमालय पर्वताच्या रांगा, पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश व नेपाळ येथे आढळतात. एप्रिल ते जून या काळात ते भारताच्या अंतर्भागात येतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली
वर्ग: पक्षी