सर्बिया आणि माँटेनिग्रो राष्ट्रीय फुटबॉल संघ
Appearance
(सर्बिया आणि माँटेनिग्रो फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
टोपणनाव | Plavi (निळे) | ||
---|---|---|---|
राष्ट्रीय संघटना | सर्बिया आणि माँटेनिग्रो फुटबॉल संघटना | ||
प्रादेशिक संघटना | युएफा (युरोप) | ||
कर्णधार | साव्हो मिलोसेविच | ||
सर्वाधिक सामने | साव्हो मिलोसेविच (१०१) | ||
सर्वाधिक गोल | साव्हो मिलोसेविच (३५) | ||
फिफा संकेत | SCG | ||
|
सर्बिया आणि माँटेनिग्रो फुटबॉल संघ हा सर्बिया आणि माँटेनिग्रो ह्या देशाचा पुरुष फुटबॉल संघ होता. १९९२ सालापर्यंत हा संघ युगोस्लाव्हिया ह्या नावाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत असे. युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर ह्या दोन देशांना युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखले जात असे. २००३ साली त्याचे नाव बदलून सर्बिया आणि माँटेनिग्रो असे ठेवण्यात आले. २००६ साली माँटेनिग्रो देश सर्बियापासून वेगळा झाल्यानंतर ह्या फुटबॉल संघाचे नाव सर्बिया फुटबॉल संघ असे ठेवण्यात आले व माँटेनिग्रो संघ नव्याने निर्माण केला गेला.