सराईघाट पूल
Appearance
सराईघाट पूल (आसामी: শৰাইঘাট দলং) हा आसाम राज्याच्या गुवाहाटी शहरामधील ब्रह्मपुत्रा नदीवरील एक प्रसिद्ध पूल आहे. १९६२ साली बांधण्यात आलेला ह्या पूलाला येथील सराईघाट ह्या परिसराचे नाव देण्यात आले आहे. सराईघाट पूल ब्रह्मपुत्रेवरील पहिला पूल होता तसेच रस्ता व रेल्वेमार्गाची एकत्रित वाहतूक करणारा भारतामधील पहिलाच पूल होता. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्या हस्ते सराईघाट पूलाचे उद्घाटन केले गेले. २०१७ साली ह्या पूलाच्या शेजारी ३ मार्गिका असलेला एक वाढीव पूल बांधला गेला.
गुवाहाटीच्या उत्तरेला स्थित असलेल्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी कडे जाण्यासाठी ह्या पुलाचा वापर करावा लागतो. तसेच भारताच्या इतर भागातून गुवाहाटी व ईशान्येकडे धावणाऱ्या बहुतेक सर्व रेल्वेगाड्या ह्याच पुलावरून जातात.