सरस्वती-पूजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सरस्वती माता आपल्या जीवनात असलेली जडता दूर करते. मात्र आपण तिची योग्य अर्थाने उपासना केली पाहिजे.

सरस्वतीचा उपासक भोगाचा गुलाम असता कामा नये. दुसऱ्याची संपत्ती पाहून त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण होता कामा नये. त्याने निष्ठापूर्वक स्वतःची ज्ञान साधना चालू ठेवली पाहिजे.

ब्रह्मा, विष्णु आणि महेश ह्यांच्या सारखे मुख्य देव माता शारदेला वंदन करतात त्याच्यामागेही रहस्य आहे. सरस्वती माता ज्ञान आणि भाव ह्यांचे प्रतीक आहे, ही गोष्ट तिच्या हातात असलेले पुस्तक आणि माळा ह्यावरून समजते. पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक आहे तर माळा हे भक्तीचे प्रतीक आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश अनुक्रमे सर्जन, पालन आणि संहार ह्यांचे देव आहेत. ह्या तीन्ही देवांना ज्ञान आणि भाव ह्यांची गरज आहे. भावविरहित सर्जन, ज्ञानाशिवाय पालन आणि समजून न घेता संहार अनर्थ निर्माण करतात. कोणत्याही कार्याच्या सर्जनात, ते कार्य टिकविण्यासाठी तसेच त्या कार्यात घुसलेले भ्रष्टाचार दूर करण्यासाठी ज्ञान आणि भाव ह्या दोहोंचीही गरज आहे, आणि म्हणूनच कोणतेही महान कार्य करणाऱ्याने सरस्वतीला वंदन केलेच पाहिजे.

सरस्वतीच्या मांडीवर वीणा आणि हातात पुस्तक आहे. तिच्या चार भुजा ही चार दिशांची प्रतीके होत. त्याचा अर्थ असा की, विद्येने माणसाची दृष्टी चौफेर होते. पुस्तक हे ज्ञान प्राप्तीचे साधन होय. तिच्या हातात एक माळही आहे. माळ ही मनाच्या एकाग्रतेचे प्रतीक होय. 'वीणा' ही माणसाच्या जीवनात रसिकता आणते, संगीत आणते.

सरस्वतीपूजन[संपादन]

उत्तर भारतात सरस्वतीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी करतात, तर महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी.

सरस्वती (बुद्धि) स्तोत्र

हेदेखील पाहा[संपादन]

वैदिक प्रतीक-दर्शन