सरदार विंचूरकर वाडा, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सरदार विंचूरकर वाडा हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या सदाशिव पेठेतील वाडा आहे.

मराठी राजकारणी, पत्रकार बाळ गंगाधर टिळक गायकवाड वाड्यावर वास्तव्यास जाण्यापूर्वी विंचूरकर वाड्यात रहात असत. केसरी छापखानाही सुरवातीस याच वाड्यात होता. बाळ गंगाधर टिळक आणि स्वामी विवेकानंदांची भेटही याच वाड्यात झाली होती [१].

या वास्तूची मालकी कृष्णकुमार दाणी यांच्याकडे होती. त्यानंतर ती वास्तू परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "विंचुरकर वाडाही काळाच्या पडद्याआड?" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. १ जुलै, इ.स. २०११. १७ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पाहिले. 



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.