सयाजी शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सयाजी शिंदे
जन्म सयाजी शिंदे
कार्यक्षेत्र अभिनय (नाटके, चित्रपट), चित्रपटनिर्मिती
भाषा मराठी (स्वभाषा, अभिनय)
कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी (अभिनय)

सयाजी शिंदे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केलेला अभिनेता, चित्रपटनिर्माता आहे. कॉलीवुड-टॉलीवुड चित्रपटसृष्टींत याचे चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. हा मूळचा सातारा जिल्ह्यातील असून मुंबईत मराठी चित्रपट-नाटके व हिंदी चित्रपटांतून अभिनय केल्यानंतर याने कॉलीवुड व टॉलीवुडाची वाट धरली. याने आतापर्यंत सुमारे ३० तेलुगू, १२ तमिळ, ४० हिंदी, ४ मराठी तसेच २ इंग्लिश, १ कन्नड व १ मल्याळम चित्रपटांमधून कामे केली आहेत.

अभिनयासोबत याने चित्रपटनिर्मितीही केली आहे. गोष्ट छोटी डोंगराएवढी (इ.स. २००९), डांबिस (इ.स. २०११) या मराठी चित्रपटांचा हा सहनिर्माता होता.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.