समीक्षेची अपरूपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg श्री./श्रीमती. समीक्षेची अपरूपे,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/लेख/जाहीरात; स्वतःच्याच इतरत्रच्या लेखनाचे/संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे. तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! संदेश = कृपया या बाबतचे आपले मत [[::समीक्षेची अपरूपे|चर्चापानावर]] नोंदवा. {{{संदेश}}}

{{{संदेश}}}

'समीक्षेची अपरूपे’(२०१७) हा डॉ. देवानंद सोनटक्के यांचा समीक्षग्रंथ असून तो हर्मिस प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केला आहे. या ग्रंथात प्राचीन आणि अर्वाचीन अशा साहित्यकृतींची व लेखकांची समीक्षा केली आहे. या समीक्षेत लेखकाचे व्यक्तिमत्त्व, साहित्यकृतीचे स्वरूप आणि तिचे अनन्यसाधारण वैशिष्ट्ये यांचा शोध घेतला आहे. उदा. चक्रधरांचा दृष्टांत हा आधुनिक कथारूप कसा आहे, तुकारामाचा, जनाबाईचा अभंग भावकविता कशी आहे इत्यादी वेध या समीक्षेत आहे. चक्रधरांचा 'परिसाचा दृष्टांत : कथातत्त्वाचे आकलन', ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतील रूपकांचा शोध, तुकारामातील लोकशिक्षक हे विषय त्यांनी यात उलगडले आहेत. याशिवाय ग्रंथात 'कुसुमाग्रजांचा साहित्यविचार', 'मुक्तिबोधांचा साहित्यविचार', 'मुक्तिबोधांचा मानुषतेचा सिद्धांत, 'दभि : साहित्यविचार आणि समीक्षा,' 'अक्षयकुमार काळे यांची मर्ढेकर समीक्षा,' काय डेंजर वारा सुटलाय आणि उत्तर आधुनिकता','दोन फुल एक हाफ : मराठी समाजाची सांस्कृतिक समीक्षा', 'टाईमपास : आत्मचरित्राच्या पलीकडे', 'दिंडीभ्रष्टाचाराची : तपशीलप्रधान कादंबरी', 'जागतिकीकरण आणि ग्रामीण साहित्याच्या दिशा', 'सीमेवरचा भाषा संसार' हे लेख आहेत.