समभाग बाजार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इ.स. १८७५ साली स्थापन झालेल्या मुंबई स्टॉक एक्सचेंजाची फिरोझ जीजीभॉय टॉवर्स नावाची वर्तमान इमारत

समभाग बाजार (इंग्लिश: Stock market / Equity market, स्टॉक मार्केट / इक्विटी मार्केट) म्हणजे कंपन्यांचे समभाग (शेअर) व अनुजात कंत्राटांचे सौदे करण्यासाठीची सार्वजनिक यंत्रणा होय. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो.

समभाग बाजारात वैयक्तिक पातळीवर सौदे करणारे वैयक्तिक गुंतवणूकदार, तसेच म्युच्युअल फंड, बँका, विमा कंपन्या, हेज फंड यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार सहभागी होतात. सार्वजनिक सौद्यांसाठी अनुसूचित झालेल्या कंपन्या किंवा उद्योगसमूहदेखील समभाग बाजारात घडणाऱ्या आपल्या समभागांच्या सौद्यांत सहभागी होतात. ऑक्टोबर, इ.स. २००८मधील अंदाजानुसार जगभरातील समभाग बाजारांमध्ये ३६,६०० अब्ज अमेरिकी डॉलरांएवढी संपत्ती गुंतलेली आहे[१].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "वर्ल्ड इक्विटी मार्केट डिक्लाइन्स: - डॉलर २५.९ ट्रिलियन (जागतिक समभाग बाजार २५,९०० अब्ज अमेरिकी डॉलरांनी घटला)" (इंग्लिश मजकूर). सीकिंग अल्फा.कॉम. ८ ऑक्टोबर, इ.स. २००८. २४ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.