Jump to content

सप्तांग सिद्धान्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सप्तांग सिद्धान्त हा कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात सांगितलेला सिद्धान्त आहे.[] सप्तांग सिद्धान्त म्हणजे राष्ट्र किंवा राज्याच्या सात प्रकृती असे कौटिल्याने सांगितलेले आहे.

सिद्धान्त

[संपादन]
  • स्वामी - राजा
  • अमात्य - मंत्रिमंडळ
  • राष्ट्र - भूप्रदेश व सीमा
  • दुर्ग - किल्ले
  • बल - सेना
  • कोष - खजिना
  • सुहृद - मित्रराष्ट्रे

कौटिल्याच्या मते हे सर्व घटक महत्त्वाचे असून त्यापैकी एखादाही घटक दुर्बल असल्यास तो राज्यविनाशाला कारणीभूत ठरतो. स्वामी म्हणजे राजा हा केंद्रस्थानी असलेला महत्त्वाचा घटक आहे. इतर घटकांना बलवान करण्याची जबाबदारी त्याचीच आहे. चंद्रगुप्ताने आपल्या प्रशासन यंत्रणेत या सप्तांगांची काळजी घेतलेली होती.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "चाणक्य के विचारों की वर्तमान प्रासंगिकता" (हिंदी भाषेत). २३ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)