सनी लिओनी
सनी लिओनी | |
---|---|
![]() | |
जन्म | सार्निया, ऑन्टॅरियो, कॅनडा |
राष्ट्रीयत्व | कॅनडियन |
संकेतस्थळ http://www.sunnyleone.com | |
सनी लिओनी (करेन मल्होत्रा - करनजीत कौर), (जन्म: मे १३, १९८१) ही भारतीय-कॅनडियन शृंगारचित्रपटातील अभिनेत्री, उद्योगपती आणि मॉडेल आहे. ती २००३मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ दी इयर होती, आणि त्याचवेळी व्हिव्हिड एन्टरटेनमेंट यांच्याकटे कंत्राटी पद्धतीने काम करत होती. मॅक्झिम मासिकाने २०१०मध्ये तिला पहिल्या १२ अग्रेसर शृंगार अभिनेत्र्यांमध्ये स्थान दिले होते. २०११मध्ये भारतीय दूरदचित्रवाणीवरील बिग बॉस या मालिकेत सहभागी झाल्याने ती प्रकाशझोतात आली.
[१]
सनी लिओनीवर गुन्हा दाखल[संपादन]
डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे सनी लिओनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सनीने तिच्या संकेतस्थळावर स्वतःची अश्लील छायाचित्रे टाकली असल्याने लहान मुले तसेच तरुण वर्गामध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे सांगत रणरागिणी शाखेने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
सनी लिओनीचे संकेतस्थळ केवळ प्रौढांनी पाहावे, असे म्हटले असले तरी ते सर्व स्तरांतून पाहिले जात आहे. भारतीय युवा पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न सनी करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा गुन्हा सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला असून तपासाकरिता ठाणे पोलिसांनी लिओनीला बोलाविले होते. त्यासाठी पोलिसांनी तिला नोटीस पाठविली होती. त्यानुसार लिओनी, तिचा पती आणि तिचा वकील असे तिघे २७ मे २०१५ रोजी दुपारी ठाणे पोलीस मुख्यालयात आले होते. तसेच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांची त्यांनी भेट घेतली. तिची वैयक्तिक,, तिच्या व्यवसायाविषयी, तसेच रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी तिचे स्पष्टीकरण, आदी माहिती या वेळी पोलिसांनी घेतली.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील सनी लिओनीचे पान (इंग्लिश मजकूर)
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Dabboo Ratnani's 2018 calendar, Can You Handel these Celebrities Hotness". sfwfun. 2020-07-10 रोजी पाहिले.