सदस्य चर्चा:Shubhalaxmi joshi kshirsagar

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Shubhalaxmi joshi kshirsagar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Shubhalaxmi joshi kshirsagar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१५८ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

ह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १५:४१, २५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

                                                    संध्याकाळ 
       
                                                                                            सौ शुभलक्ष्मी जोशी क्षीरसागर 
 

संध्याकाळची शामल वेळ सहजच लक्ष जाते ते अथांग आभाळाकडे !दिवसभर थकलेला सूर्य क्षितिजाकडे कललेला .! अगदी रक्तरंजित गोळाच जणू . दिवसभर चिमुकल्या चोचीने काही न काही वेचणाऱ्या पक्षांची झाडावरची जत्रा आणि घरट्याचे वेध लागल्याने आभाळात गर्दी करणारे पक्षी .आभाळात मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्ष्याचां विहंगमेळा ! सूर्य झुकलेला ,सगळीकडे निळसर सोनेरी छटा ,डोंगरावरून परतणारी गुरे ,आणि संथ वाहणारी प्रसंन्ननदी !

      खरच हया नदीच आणि आभाळाच काय बरे नाते असेल? दोघातील अंतर समांतर रेषेचे ! कधीही न जुळणारे ! पण दोघातील साम्य एकच ! दुसऱ्याला सामावून घेण्याच ! एकरूप करण्याच !
             आभाळ ही अथांग अंत न लागणार ठाव नसणार आणि नदी सुद्धा अथांग अविचल .अविरत वाहणारी . पशुपक्षान  पासून माणसाची सुद्धा तृष्णा भागवणारी सरिता .न रुसणारी न रागावणारी वाहण्याचे न थांबता गरीब श्रीमंत हीन दिन असा भेदभाव न करता सगळ्याशी सारखीच वागणारी ! निष्प्रभ नदी !

कधी ही कुणासाठीही न थांबणारी सन्यस्त नदी. आभाळ आपल्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेते .कि जणू हे विहंगपणे भ्रमण करणारे पक्षी त्याचीच निर्मिती वाटते .अगदी स्वछनदी पणाने विहार करणारे ती त्याचीच लेकरे वाटतात . अस हे नदी आणि आकाशाचं एकच तत्व दुसरयाला सामावून घेण्याच .किती सहजपणे आभाळ काय अन नदी काय अगदी सहजपणे ते दुसऱ्याला आपलसे करतात .मिसळून घेतात . पण आपण माणसासारखी माणस पण आपल्याला नुसत दुसऱ्याच अस्तित्व सुद्धा नकोसे वाटते .पण सामावणे तर बाजूलाच.

       खूप तुडुंब दुथडी भरून नदी वाहू लागल्यावर ती अहंकाराने फुलत नाही कि कोरडी पडली म्हणून विव्हळत नाही. आभाळा ही असेच गडगडणार्या ढगांनी ,बरसणाऱ्या मेघांनी ,चमकणाऱ्या विजांनी बावरत नाही काही .किवां शितल अशा शांत चांदण्याची मिजासी सुद्धा मिरवत नाही. 
     पौर्णिमेचा चंद्र आणि शुक्राच्या टपोऱ्या चांदणी भोवती चमचमणाऱ्या तारका हे आकाशाचं विलोभनीय दृश्य कुणालाही भुरळ पाडणारे . अवसेच्या दिवशी तर चंद्राची पूर्ण रजा असूनही आभाळ रुसत नाही काही. 
        अथांग अशा आभाळरुपी छपराचा आपल्याला कितीतरी मोलाचा आधार वाटतो . आणि अविरत वाहणारी नदी जवळची सखी वाटते . हे असे वाटणेच निसर्गाची अनुभूती नाही का ? आपण सुद्धा हा आदर्श
घेऊन  कुणाला तरी आधार वाटेल असे वागायला हवे नाही का ?

... ...


हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! Shubhalaxmi joshi kshirsagar (चर्चा) १५:४३, १ मार्च २०१७ (IST)[reply]

              पहाट 

पहाटओली दवात नाहली रवीकिरणांनी प्रभात झाली

       गर्द निळा अन मत्त केशरी
       सप्तसुरानि सजलि अवनि

खुणावतो तो शशीधर सदनी हलकेच खुलली जाई जूई

     धुक्यामधुनी ती पहाट आली
     पवनाने ती घालुन फुन्कर

प्राजक्त ही गेला बहरून केशरी गुलाब फुलला

    सदाफुली ही नाजूक हसली
    अबोली अता का रुसली?

हात लाविता खुदकन फुलली घेऊन फुलांची ही ओन्जळ

   उभी अशी मी आंगणी
   रिक्त करावी आता कुणाच्या
   पदचरणी?
कल्याणी

इंद्रधनु Tuesday, 7 March 2017Posted by Shubhalaxmi Joshi Kshirsagar at 00:51 No comments: Email ThisBlogThis!Share to TwitterShare to FacebookShare to PinterestMonday, 6 March 2017 पहाट




पहाटओली दवात नाहलीरवीकिरणांनी प्रभात झाली गर्द निळा अन मत्त केशरी सप्तसुरानि सजलि अवनिखुणावतो तो शशीधर सदनी



हलकेच खुलली जाई जूई धुक्यामधुनी ती पहाट आली पवनाने ती घालुन फुन्करप्राजक्त ही गेला बहरूनकेशरी गुलाब फुलला सदाफुली ही नाजूक हसली अबोली अता का रुसली?हात लाविता खुदकन फुलली घेऊन फुलांची ही ओन्जळ उभी अशी मी आंगणी रिक्त करावी आता कुणाच्या

   पदचरणी?