Jump to content

सदस्य चर्चा:Manojsangle

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Manojsangle, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Manojsangle, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७१६ लेख आहे व १६५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

विकिप्पीडियावर लिहिण्यासाठी तीन सोप्या पायऱ्या : संपादनवर टिचकी मारा, लिहा साहाय्य लागल्यास मेनुबार पहा, शेवटी जतन करा.

नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा  येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी  तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. 

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

मुख्य लेख नामविश्वातील लेख "मनोज सांगळे"

[संपादन]

नमस्कार,

आपण मराठी विकिपीडियावर लेखनाचे प्रथम प्रयत्न केलेत या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन. तथापि मराठी विकिपीडिया एक सर्व साधारण वेबसाईट नसून एक ज्ञानकोश आहे.मराठी विकिपीडिया केवळ एक विश्वकोश आहे. मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते.त्यामुळे आपल्या सवडीनुसार विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा लेखाची माहिती घ्यावी.अनवधानाने होणाऱ्या त्रूटी टाळणे सोपे जाईल.

मनोज सांगळे लेखात आपण नमुद केलेली स्वत:ची ओळख, केवळ ओळख नोंदवण्याचा उद्देश असल्यास आपल्या सदस्य:Manojsangle या सदस्य पानावर ओळख हलवली , त्यात आपण यथावकाश सुयोग्य बदल करू शकता.

आपण मुख्य लेख नामविश्वात लिहिलेल्या मनोज सांगळे या लेखात उल्लेखनीयता आणि हितसंघर्ष हे दोन लेखन संकेतांची सूचना देणारे साचे लावले गेले आहेत ते आपण समजून घेऊ.
मुख्य लेख नामविश्वात संपादक, पत्रकार, स्तंभलेखक नात्याने अंशत: विश्वकोशीय उल्लेखनीयता दखलपात्र होते परंतु अडचण पुढे आहे. आपण स्वत: विपूल लेखन केले असले तरी आपल्या(कार्या)बद्दल तिसऱ्या व्यक्तिने इतर (संदर्भयोग्य ) स्रोतात दखल घेतली गेली असणे विश्वकोशीय लेख बनवण्याच्या दृष्टीने उपयूक्त माहिती देणारे ठरते. अशी माहिती उपलब्ध होई पर्यंत मुख्य लेख नामविश्वात मनोज सांगळे हा लेख मुख्य लेख नामविश्वात समाविष्ट करणे जड जाते. त्या शिवाय हितसंघर्ष संकेता येथील माहिती अभ्यासावी.
संदर्भनीय त्रयस्थ स्रोत उपलब्ध असल्यास ते कृपया कळवावेत .संदर्भनीय त्रयस्थ स्रोतातून माहिती उपलब्ध होई पर्यंत, मुख्य लेख नामविश्वातील मनोज सांगळे लेख वगळला जाण्याची शक्यता असू शकते.हा विकिपीडियातील सामान्य प्रक्रीयेचा भाग आहे.या प्रक्रीयांनी विचलीत न होता विकिपीडियाशी असलेला आपला स्नेह वृद्धींगत व्हावा, आपल्या हातून आपल्या आवडीचे विश्वकोशीय लेखन वाचन घडत रहावे, हि आशा आणि नम्र विनंती.

आपला नम्र

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:०५, १९ जून २०१३ (IST)[reply]

हा फरक अभ्यासावा १

[संपादन]

कृपया पहावे: विकिपीडिया एक ज्ञानकोश आहेत . येथील लेखनशैली आणि पत्रकारांची वार्तांकन शैली यातील फरक लक्षात येण्याच्या दृष्टीने अभ्यासावे.

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:०५, १९ जून २०१३ (IST)[reply]

बुलडाणा लाइव्ह (BULDANA LIVE)

[संपादन]

बुलडाणा लाइव्ह ही लाइव्ह ग्रुप संचालित बुलडाणा जिल्ह्यातील लोकल न्यूज वेबसाईट आहे. २४ एप्रिलला या वेबसाईटची स्थापना वरिष्ठ पत्रकार मनोज सांगळे यांनी केली. बुलडाणा जिल्ह्यात अल्पावधीत लोकप्रिय झालेली ही वेबसाईट असून, डिसेंबर २०२० अखेर वेबसाईटचे १ लाख वाचक असल्याची नोंद आहे. ताज्या बातमी तातडीने देण्याबरोबरच दर्जेदार पत्रकारिता करण्यावर बुलडाणा लाइव्हचा भर आहे. कार्यालय : बुलडाणा लाइव्ह, बुलडाणा अर्बन बँकेच्या वर, चिखली रोड, बुलडाणा. मो. ८८८८०१००४६