सदस्य चर्चा:Digambar pawar

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Digambar pawar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Digambar pawar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,९६३ लेख आहे व १७६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) ००:३०, २४ जानेवारी २०२० (IST)[reply]

मजकू असलेल्या लेखात समाविष्ट करणे[संपादन]

नमस्कार,

भाई कोतवाल यांच्यावर विठ्ठल लक्ष्मण कोतवाल या मूळ नावाने लेख आहे. त्यात आपण लिहिलेला महत्वाचा मजकूर कृपया समाविष्ट करावा. तसेच याला विश्वसनीय अशा साहित्याचे संदर्भ द्यावेत. तो मजकूर चुकीच्या ठिकाणी लिहिला गेल्याने इथे खाली डकवत आहे. काही मदत लागल्यास माझ्या चर्चा पानावर लिहावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४८, २४ जानेवारी २०२० (IST) -[reply]

भाई कोतवाल यांचे मूळ नाव विठ्ठल कोतवाल असे होते.त्यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे एका नाभिक (न्हावी)कुटुंबात झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण माथेरान येथेच झाले.पुढील शिक्षणासाठी ते आपल्या आत्या श्रीम.गौरीताई हळदे यांच्याकडे पुणे येथे गेले .आपले पदवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पुण्यातील वाडिया महाविद्यालयात पूर्ण केले.त्यानंतर मुंबई येथे law चे शिक्षण घेऊन सन1941 साली ते advocate झाले.

भाई कोतवालांचा विवाह सन1935मध्ये पुण्यातील इंदू तिरलापूरकर यांच्याशी झाला.त्यांना भरत आणि जागृती अशी दोन मुले होती.

आपल्या वडिलांचा परंपरागत व्यवसाय न करता त्यांनी वडिलांच्या इच्छे विरुद्ध माथेरान येथे समाजकार्य सुरु केले.त्यांनी मुंबई किनारपट्टीवरील वादळाचा तडाखा बसलेल्या कोळी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला.त्यानंतर राजाराम उर्फ भाऊसाहेब राऊत यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उडी घेतली.त्यांनी माथेरान परिसरातील सामान्य जनतेला मतदानाचा हक्क मिळवून दिला.तसेच मतदार यादीत त्यांची नावे टाकण्यास मदत केली.त्यांनी भूमीहिनांच्या मुलांसाठी 42 voluntary school सुरु केल्या.दुष्काळाच्या वेळी जमीनदारांनी गरीब शेतकऱ्यांना धान्य देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी भाऊसाहेब राऊत यांच्या आर्थिक साहाय्याने गरिबांसाठी धान्य बँक सुरु केली.

त्यांच्या अशा या सामाजिक कार्यामुळे ते सन1941साली माथेरान सिटी कौन्सिल मध्ये vice chairman म्हणून निवडून आले.आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते.9ऑगस्ट1942 च्या महात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या चले जाव चळवळीत हि ते सहभागी होते. ब्रिटिशांनी सदर चळवळीत सामील झालेल्या मोठ्या नेत्यांना अटक केली होती.त्यात भाई कोतवाल हि होते.त्यानंतर ते भूमिगत झाले.भूमिगत होऊन त्यांनी “कोतवाल दस्ता”नावाची संघटना स्थापन केली.या संघटनेत50जणांचा सहभाग होता.त्यात शेतकरी आणि शिक्षकांचा सहभाग होता.यात त्यांचे चुलत बंधू आणि आते भाऊ दत्तोबा हळदे हि सामील होते.त्यांनी मुंबई शहराला वीज पुरवठा करणारी प्रमुख वीज वाहिनी कापण्याचा डाव आखला.सप्टेंबर1942ते नोव्हेंबर 1942 या कालावधीत त्यांनी 11वेळा हे काम केले.त्यांच्या या कृत्यामुळे ब्रिटिश पोलिसांनी भाई कोतवाल यांना पकडण्यासाठी 2500 रुपयांचे बक्षीस जाहीर केले.आणि त्यांना पकडण्यासाठी DSP R. Hallआणि stafford या अधिकाऱ्यांची नेमणूक केली.

ज्यावेळी ” कोतवाल दस्ता” मुरबाड तालुक्यातील सिद्धगड च्या घनदाट जंगलात लपलेले असताना त्यांनी मदतीसाठी एक पत्र आपल्या सहकाऱ्यांना पाठवले.परंतु ते पत्र एका जमीनदाराच्या हाती लागले. त्या जमीनदाराने ते पत्र ब्रिटिश अधिकारी हॉल याला दिले.

2 जानेवारी1943 च्या दिवशी भल्या पहाटे आझाद दस्ता दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या दृष्टीने मदतीची वाट पाहत असताना ब्रिटिश अधिकारि हॉल आणि स्टॅफोर्ड यांच्या पथकाने समूहावर हल्ला चढविला. या हल्ल्यात आझाद दस्त्याच्या गोमाजी पाटील यांचा तरुण मुलगा हिराजी पाटील शहीद झाला.सदर हल्ल्यात भाई कोतवालांच्या मांडीला गोळी लागल्यामुळे त्यांना जागचे हालताही येत नव्हते. अशातच क्रूर हॉल ची नजर भाईंवर पडली .त्याने क्षणाचाही विलंब न करता भाईंवर गोळी झाडली.आणि एका तळपत्या सूर्याचा अस्त झाला.

भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली.त्यांच्या या बालिदानामुळेच त्यांना “वीर भाई कोतवाल”आणि “हुतात्मा हिराजी पाटील” आदराने म्हटले जाते. जय हिंद!