सदस्य चर्चा:DeepakDhande
स्वागत | DeepakDhande, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | DeepakDhande, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,३६५ लेख आहे व १५१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
अभ्यस्त होण्यासाठी स्वत:ला वेळ द्या
[संपादन]सर्व प्रथम आपले मराठी विकिपीडियावर स्वागत. आपल्याकडून अनवधानाने संदर्भ दिलेल्या दुव्यात बदल केले जात आहेत. संदर्भदुवे मृत असलेतरी विश्वासार्ह स्रोतातून घेतलेल्या माहितीचा संदर्भ परस्पर बदलणे योग्य नाही. सध्या लिंका बदलण्यास तात्पुरता विराम देऊन इतर वाचन साहाय्य पानांचे वाचन आणि इतर लेखनावर भर द्यावा अशी नम्र विनंती आहे.
दुव्यांच्या संदर्भात आपणास जे बदल करावयाचे आहेत त्यांची आधी संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर चर्चा करणे अधिक प्रशस्त असेल.चर्चापानावर आणि लेखाच्या आढाव्यात मराठीचा वापर करावा. आढाव्यातील भाषेत नम्रताही जपण्याचा प्रयत्न असावा. सध्या तरी आपली शक्यती संपादने उलटवली जात आहेत.
आपल्या आवडीचे वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:५२, ८ फेब्रुवारी २०१४ (IST)
श्री./श्रीमती. DeepakDhande,
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे. व्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन (पूर्वग्रहित नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराच्या वापराबद्दल माहिती
असे का ? या संदेशाचा विस्तार
आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! | |
{{{संदेश}}} |
सहकार्या करता धन्यवाद
[संपादन]सहकार्या करता धन्यवाद
पहिलेतर आपल्या सदस्य खात्याच्या Preferences मध्ये Internationalisation येथे मराठी भाषा निवडावी दुसरे तिथेच खाली Enable the Universal Language Selector हा पर्याय दिला आहे तो निवडल्यास टायपींग करता मराठी भाषा निवडणे सोपे होईल. इंग्रजी लेखनास प्रतिसाद देणे जरा कष्टाचेच होते. चर्चा पानावर केलेल्या विनंत्या मिटवण्याची घाई टाळल्यास बरे राहील कारण संवाद मध्ये खुंटण्याची शक्यता निर्माण होते. मार्गदर्शन करणे अवघड जाते.
आणि मुख्य म्हणजे <ref> </ref> <ref name="test" /> या टॅग्स मधील संदर्भ दुवे मजकुर केवळ डेड लिंक इत्यादी आहे म्हणून तेवढ्या एका कारणासाठी बदलू नये
- एकतर टॅगच्या अलिकडील सदर मजकुर जेथील संदर्भावर आधारीत आहे त्याच ते क्रेडीट असत त्या लेखाच्या लेखकाच क्रेडीट असत; दुवा नंतर भले मृत होऊ दे दुसरेतर आपण त्या जागी टॅगच्या आत तिसराच दुवा संदर्भ आणि मजकुर न तपासता दिल्यास आपण अप्रत्यक्षपणे वाचकाची दिशाभूल करत असतो. तिसरा महत्वाचा (असे न होवो) पण एखादा प्रश्न कॉपीराईट संदर्भाने प्रकरण न्यायालयात गेल्यास गैरसमजांचा गोधंळ दूर करण्यास अधिक वेळ लागू शकतो आणि चूकीच्या लोकांच्या वेळेच्या अपव्ययाची शक्यता निर्माण होऊ शकते.
- बाह्य दुव्यांच्या बाबतीत अनावश्यक दुवे वगळण्याची गरज आहे हे खरे आहे परंतु आपल्या कडे (मराठी लोकांना नवागतांना) अद्यापही मोठ्या प्रमाणावर <ref> </ref> <ref name="test" /> कठीण गेल्या मुळॅ अथवा कल्पना नसल्यामुळे संदर्भ बाह्यदुव्यात नमूद केले गेले आहेत. ते तपासून मुख्य मजकुरात संदर्भ देणे गरजेचे असू शकते. याही बाबतीत केवळ बाह्य दुव्यात असलेला संदर्भ दुवा उडवला आणि कॉपीराईट इश्यू आले आणि सदर नवागत लेखकाला आणि त्याच्या वकीलाला इतिहास तपासण्याचे कौशल्य नसले सदर मजकूर दुसऱ्या संदर्भावर अवलंबून होता असे सिद्ध करण्यात घोळ होऊ शकतात. ज्यांनी गूड फेथ मध्ये मराठी विकिपीडियाकरता लेखन केले त्यांना हकनाक जाच प्रसंगांना सामोरे जावे लागू नये म्हणून काळजी घेतलेली बरी. त्या मुळॅ हे काम हाती घेणे जरूरी आहे पण घाई न करता एक एक दुवा मजकुरा सोबत तपासून केलेले चांगले असेल.
- मराठी संकेतस्थळे लेखा मध्ये बंदपडलेल्या मराठी संकेतस्थळांबद्दल वेगळा परिच्छेद आणि माहिती घेतलेल्ली बरी पडेल. तो लेख अद्ययावत करण्याची गरज आहे हे खरे आहे.(ते कार्य माझ्या कामाच्या यादीतही आहे.) त्या लेखात पण <ref> </ref> <ref name="test" /> टॅग्स मधील संदर्भ बदलल्यामुळे आपले बदल उलटवावे लागले.
मी वर म्हटल्या प्रमाणे इतर विषयातील लेखना पासून सुरवात केल्यास अवगत होण्यास आपणास अवधीही मिळेल आणि मराठी विकिपीडियाला चांगल्या विश्वकोशीय मजकुराची प्राधान्यता इतर गोष्टींपेक्षा अधीक आहे.
आपणास शुभेच्छा आणि धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१५, ८ फेब्रुवारी २०१४ (IST)