सदस्य चर्चा:DEVANAND SONTAKKE
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )
[संपादन]
.
|
|
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )
[संपादन]
|
|
|
नकुशी झाली स्मीता !
प्रा. देवानंद सोनटक्के
सध्या वर्तमानपत्रातून रोज नशीच्या बातम्या येत आहेत. ते वाचून मला माझ्या आठवणीतील नकुशी आठवली. त्यावेळी मी हुपरी जि. कोल्हापूर येथे प्राध्यापक होतो. बी. ए .तीन चा वर्ग. हजेरी घेताना नाव वाचले ..नकुताई तळेकर. मी दचकलोच. उच्चशिक्षण घेणारी मुलगी नकुशी? ‘यस् सर’ आवाज आल्याने वर बघितले. एक सावली. ठेंगणी. बारीक.केस नीट विचारले. कपडे व्यवस्थित. डोळे मोठे. रेखीव. बोलके. मुख्य म्हणजे चेहऱ्यावर तेज. फार सुंदर नसली तरी रेखीव आणि तरतरीत...नकोपणाच्या कुठल्याच खुणा नव्हत्या. तरीही मी अस्वस्थ झालो. मी नवीन होतो. नकुशीचा अर्थ शब्दशः अर्थही डाचत होता. वर्ग संपल्यावर तरी कसे विचारायचे? बाहेर भेटल्यावर फक्त विचारले “तुझे नाव कोणी ठेवले?” म्हणाली “आजी आजोबांनी!” तिला बहुधा अशा प्रश्नाची सवय होती. तिने मला उलट काही विचारले नाही. मी तर तिच्या अभ्यासाकडे प्रगतीकडे लक्ष देऊ लागलो. जाणवले ती हुशार होतीच, नियमित होती तास कधी बुडवला नाही. फार आत्मविश्वास मात्र नव्हता. मुख्य म्हणजे मितभाषी नव्हे अबोलाच होती. खूप खळखळून हसताना तिला कधी पहिलेच नाही. तिच्याबद्दल कळले ते असे : ती पाचसात किमीवरील गावावरून येते. तिथे ते स्थलांतरित झाले होते राजापूर- रान्तागिरी जिल्हा. हुपरीजवळील राजापूरवाडी म्हणून कोकणातील धरणग्रस्तांच्या वसाहतीत ती राहायची. वडील नोकरीवर होते. एकूण सहा बहिणी. हिचा नंबर पाचवा. कोकणात अंधश्रद्धा फार. मुलगा व्हावा म्हणून हीचे नाव ठेवले नकू! पण सहावीही झाली ती मुलगीच. आता काळानुसार तिच्या आईवडिलांच्या मनात तो नकाराचा भाव राहिला नसेल पण नाव मात्र कायम राहिले. नकुताई.. तिने पत्रकारीतेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. लघुप्रबंधाला मीच मार्गदर्शन केले. उत्तरायण चित्रपटाचे परीक्षणही सुंदर लिहिले होते. महाविद्यालयाच्या नियतकालिकातही तिचा मी लेख छापला. आता ती प्रसन्न हसायची. इतर मुलींनाही मी विश्वासात घेऊन तिला चांगली वागणूक द्यायचे सांगितले. पत्रकारीतेची अभ्याससहल होती. सर्वा मुले मुली घेऊन कोलापुरात गेलो. जेवायला थांबलो तेव्हा साऱ्यांना मी सांगितले की “आपण तळेकरचे नाव बदलायचे. काय ठेवूया? तुझी हरकत नाही ना तळेकर?” तिने –मुलांनी होकार भरला. इतके दिवस ती गोष्ट साऱ्यांनाच खटकत होती. त्यमुळे मी पर्यायी नावे विचारले. दरवेळी मी तिच्या चेहऱ्यावरील पसंती नापसंती बघायचो. सुनिता. मीना सारे झाले .पटकन मला सुचले..स्मीता! त्याबरोबरच तीही खुश झाली. सर्वानी होकार दिला. एकसुरात हो म्हणाले.सर्वानी तल्या वाजविल्या. त्यानंतर दिवसभर तिला सर्वजण स्मिताच ह्मणत. ट्रीप संपली. तेथून पुढेही वर्गमित्र-मैत्रिणी तिला स्मिताच म्हणायचे. आम्हा साऱ्यांनाच आनंद झाला. त्यानंतर ती खूशच दिसली. बी. ए. पूर्ण झाल्यावर तिने आमचे कॉलेज सोडले. विद्यापीठात एम ए.ला प्रवेश घेतला.पुढे काही दिवसांनी तिचे लग्न जुळल्याचे कळले. नवरा नोकरीवर होता. माजी विद्यार्थी मेळाव्याला बोलवायला फोन केला, आई बोलली. ती येऊ शकणार नाही ती आई होणार आहे. आज तीनचार वर्षे होऊन गेलीत. ती कुठे आहे ठाऊक नाही . तिथे पेपर पोचतो? ती वाचते? तिच्या सासरी तिचे नाव बदलले? तिने नवऱ्याला स्मीता या नावाबद्दल सांगितले? तिच्या आई बाबाना ही गोष्ट कळली का? काही कळायला मार्ग नाही. पण या बातमीने मन भूतकाळात गेले.
प्रा. देवानंद सोनटक्के कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर.
विकीपत्रिका सभासद नोंदणी ....! | ||
नमस्कार, DEVANAND SONTAKKE
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल. मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर. कळावे - खबर्या (विकीपत्रिका) |