सदस्य चर्चा:पावरा लक्ष्मण मोगरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पावरा लक्ष्मण मोगरा

 • ही कविता नसून औषध आहे:*
 • डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी*

माणूस काय करतो ?

कुढतो जास्त , अन रडतो कमी ! म्हणून त्याचं हृदय , धडधडत असतं नेहमी !

        बोलणं कमी झाल्यामुळे ,
         प्रश्न निर्माण झालेत !
          सारं काही असूनही ,
          एकलकोंडे झालेत !

भावनांचा कोंडमारा , होऊ देऊ नका ! हसणं आणि रडणं , दाबून ठेऊ नका !

        आपल्या माणसांजवळ ,
          व्यक्त झालं पाहिजे !
         खरं खरं दुःख सांगून ,
         मोकळं रडलं पाहिजे !

हसण्याने , रडण्याने , दबाव होतो कमी ! भावनांचा निचरा , ही Fresh होण्याची हमी !

      कुणाशी तरी बोला म्हणजे ,
         हलकं हलकं वाटेल !
        दुःख जरी असलं तरी ,
         मस्त जगावं वाटेल !

येऊद्याना कंठ दाटून , काय फरक पडतो ?

 • आपल्या माणसाजवळच*,

गळ्यात पडून रडतो !

      *आपली माणसं* , *आपली माणसं* ,
       बाजारात मिळत नसतात !
        नाती-गोती जपून ती ,
       निर्माण करावी लागतात !

भौतिक साधनं जमवू नका ,

 • आपली माणसं* जमवा !

नाहीतर तुम्ही गरीब आहात , कितीही संपत्ती कमवा !

        हाय , हॅलो चे मित्र बाबा ,
         काही कामाचे नसतात !
         तुझी पाठ वळली की ,
          कुत्सितपणे हसतात !

हसण्यासाठी , रडण्यासाठी , माणसं जपून ठेव ! नाहीतर मग घरात एखादा " रोबोट " तरी आणून ठेव !

       रोबोटच्याच गळ्यात पडून ,
         हसत जा , रडत जा !
         शांत झोप येण्यासाठी ,
         दररोज गोळ्या घेत जा !

दुःख उरात दाबून वेड्या , झोप येत नसते ! हसत खेळत जगण्यासाठी माणसांचीच गरज असते ,

इथून पुढे भिशी कर ,

       हसण्याची अन रडण्याची !

हीच खरी *औषधं* आहेत ,

      *डिप्रेशनच्या* बाहेर पडण्याची !!

......वरील कवितेचे कवी माहीत नाही .....

जगणे म्हटले तर खूप अवघड म्हटले तर सोपे आणि सहज छोटे छोटे प्रसंग सांगतात सत्य - असत्य म्हटले तर शिकवण नाहीतर नुसतीच वण वण

कोणीतरी लिहिली अन मला पाठवली मला भावली आणि त्याहून जास्त पटली........

पावरा लक्ष्मण मोगरा मो नं -9420076080 मु तिनसमाळ पोस्ट राजबर्डी ता.धडगाव जि नंदुरबार

नलगव्हन गाव धडगाव ता जि नंदुरबार[संपादन]

नंदुरबार जिल्ह्यातील सूर्यास्त उशिरा उगवणारे एक आगळे- वेगळे गाव --नलगव्हन ता. धडगाव

    नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यापासून 19 km वर असलेले, निसर्गरम्यात वसलेले, अति-दुर्गम भागात डोंगर दर्यात वसलेले ,निसर्गाशी मिळते-जुळते एका आदिवासी वसाहतीचे नाव नलगव्हन होय.
    नलगव्हन गाव डोंगर दऱ्यात असून या गावात तिन्ही ऋतूनुसार सूर्याच्या उगवण्याचा काळ बदलत असतो. विशेषतः पावसाळ्यात 9ते 9:30 वाजेपर्यंत सूर्य उगवतो व हिवाळ्यात 11ते 11:30 वाजेपर्यंत उगवतो. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव असे ठिकाण आहे की हिवाळ्यात त्या ठिकाणी 11ते 11:30 वाजेपर्यंत सूर्य उगवत नाही. असे नलगव्हन गावातील राहिवासीयांचे म्हणणे आहे.


गावाचा इतिहास---

     नलगव्हन गाव धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्द या ग्रामपंचायती मध्ये मोडते. नलगव्हन गाव नलगव्हन गाव आदिवासींची पाडा पद्धतीतील वसाहत आहे.किमान 70-80 घरांचे गाव आहेत .नलगव्हन हे गाव आदिवासी भिल समाजाचे समुदाय वसाहत करून राहतात. 

सकाळच्या सूर्यप्रकाश न मिळत असल्याने होणारे दुष्प परिणाम --

      वैज्ञानिक दुर्ष्टीने पाहायला गेल्यास नलगव्हन गावातील लोकांवर शारीरिक, मानसिक अशा प्रकारे आरोग्यावर परिणाम होत असतो. सकाळच्या वेळी सूर्यप्रकाश न मिळाल्याने येथील लोकांना `ड ' जीवनसत्वाची कमतरता भासू लागते .तसेच अनेक प्रकराचे शारीरिक, आणि मानसिक आजार उदबऊ शकतात.

राहणीमान--

    नलगव्हन गावातील वसाहत हि आदिवासी जमात असून भिल समाजाचे लोक राहतात .सामान भाषा बोलणारे ,एकच संस्कृती पारंपारिक पद्धतीने चालवून आणणारे आणि भौगोलिक दृष्ट्या वातावरणाशी मिळते -जुळते असणारे भिल समाज नलगव्हन गावात राहतो .

व्यवसाय--

     आदिवासी जमात हि अतिदुर्गम भागात वसाहत करणारी असून शेती हा त्यांचा उपभोगाच्या व्यवसाय आहे .त्याचबरबोर जंगलातील डिंक काढणे, तेंदूची पाने गोळा करणे ,कंद मुळे काढणे, फळ गोळा करणे हे नलगव्हन गाव वाल्यांचे रोजचे काम असते .आणि त्याचबरबोर पशुपालन म्हणून गाय, शेळी, मैस, बैल ,कोंबड्या इ. पशु पाळत आहे .

संस्कृती-आदिवासी जमात हि पूर्वजांची पारंपारिक पद्धतीने, रुढीने चालवत आलेली संस्कृतीशी घट्ट धरून आहेत.नलगव्हन गावातील भिल समाज वसाहत करत असून ,समान भाषा बोलणारा समाज आहे.

    भिल समाजात होळी, दिवाळी ,भोंगऱ्या इ. प्रमुख सन आहेत.
  नलगव्हन गाव हे भौगोलिक दृष्ट्या अतिदुर्गम भागातील सूर्य उशिरा उगवणारे एक गाव आहे . 
शासनाच्या योजना--
    नलगव्हन गाव रोषमाळ खुर्द ग्रामपंचायतीमध्ये मोडत असल्याने व अतिदुर्गम भाग असल्यामुळे शासनाच्या कोणताही विकास नाही. या गावात अजून सुद्धा रस्ते, वीज नाहीत. येथील राजकीय लोक नलगव्हन गावाला दुर्लक्षित केले आहे. 
  - लक्ष्मण मोगरा पावरा

मो नं -9420076080 रा तिनसमाळ ता धडगाव जि नंदुरबार पावरा लक्ष्मण मोगरा (चर्चा) ००:१६, २३ फेब्रुवारी २०१९ (IST)

राग[संपादन]

नवीन "राग" भेटला मला पाहून म्हणाला... काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?

मी म्हणालो अरे नुकताच "संयम" पाळलाय घरात आणि "माया" पण माहेरपणाला आली आहे..

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!!

पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत, खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला..!!

आज मला पाहून म्हणाली अरे "कटकट" आणि "वैताग" ची काय खबरबात ?

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा.. हल्ली मी "भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी..!!

पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना.... त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला..!! मीही मग मुद्दाम "गडबडी" कडे लिफ्ट मागितली आणि तिथून सटकलो..!!

पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं, मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"

मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी "तसं "लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात. कस काय सर्व ? घरचे मजेत ना?"

मी म्हणालो, "छान" चाललय सगळं... "श्रद्धा" आणि "विश्वास" असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं..!!

थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं, धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय..

मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय... एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत.. दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं नावच "समाधान" ठेवलंय..!! ~पावरा लक्ष्मण मोगरा मो नं -9420076080 रा तिनसमाळ ता धडगाव जि नंदुरबार पावरा लक्ष्मण मोगरा (चर्चा) ००:१८, २३ फेब्रुवारी २०१९ (IST)

तिनसमाळ गावतील कुटुंब ,गावकरी (लक्ष्मण मोगरा पावरा यांच्या सर्वे नुसार )[संपादन]

तिनसमाळ गावातील गावकरी सदस्य 1)प्रकाश मोगरा पावरा 2)मोगरा हुन्या पावरा 3)भाईदास मोगरा पावरा 4)विजय तुडका पावरा 5)भाईदास तुडका पावरा 6)योगेश लालदास पावरा 7)राकेश लालदास पावरा 8)लालदास खाज्या पावरा 9)शिलेदार कोटा पावरा 10)गोपाल कोटा पावरा 11)भाईदास डोगरसिंग पावरा 12)डोगरसिंग आरशा पावरा 13)रामदास गोन्या पावरा 14)संजय दमण्या पावरा 15)दमण्या आरशा पावरा 16)आरशा नान्या पावरा 17)भाईदास चिवला पावरा 18)सायसिंग चिवला पावरा 19)चिवला उग्रावण्या पावरा 20)जयसिंग चिवला पावरा 21)पिंट्या जयसिंग पावरा 22)बावा सेल्या पावरा 23)रडत्या वेल्या पावरा 24)वेल्या नेरब्या पावरा 25)टुक्या नेरब्या पावरा 26)दारासिंग टुक्या पावरा 27)पिंटा टुक्या पावरा 28)मालसिंग शंकर पावरा 29)भिखा शंकर पावरा 30)इंदास गुलाबसिंग पावरा 31)गुलाबसिंग गुंजाऱ्या पावरा 32)डोगरसिंग वेस्ता पावरा 33)ठोबा टेट्या वसावे 34)टेट्या.....वसावे 35)जयला टेट्या वसावे 36)सेवल्या....वसावे 37)फाडा उग्रावण्या पावरा 38)तुडका फाडा पावरा 39)फोपा फाडा पावरा 40)राजेंद्र सरदार पावरा 41)गुंजाऱ्या हुन्या पावरा 42)किसन गुंजाऱ्या पावरा 43)विजय गुंजाऱ्या पावरा 44)जोरदार हुन्या पावरा 45)विरसिंग हुन्या पावरा 46)दारासिंग टेट्या पावरा 47)काळुसिंग सजना पावरा 48)गणपत ईस्मल पावरा 49)गोन्या आरशा पावरा 50)रोहिदास गोन्या पावरा 51)डोगरसिंग गणपत पावरा 52)अनिल गणपत पावरा 53)देवा गणपत पावरा 54)तानाजी खाज्या पावरा 55)किसन नंगाऱ्या वसावे 56)आरद्या.....वसावे 57)भाईदास आरद्या वसावे 58)रामदास किसन पावरा 59)रायघा आरद्या पावरा 60)भानुदास रणजित पावरा 61)नटवर रणजित पावरा 62)जयसिंग रणजित पावरा 63)बिन्नर जयसिंग पावरा 64)काळुसिंग रणजित पावरा 65)राजेंद्र रणजित पावरा 66)केशव रणजित पावरा 67) फत्तेसिंग रणजित पावरा 68)संजय गणपत पावरा 69)गुलाबसिंग सोन्या पावरा 70)भरत शिवाजी पावरा 71)किरसिंग शिवाजी पावरा 72)भरत आट्या पावरा 73)सामसिंग आट्या पावरा 74)गोट्या सोन्या पावरा 75)अनिल गोट्या पावरा 76)सुकलाल गावज्या पावरा 77)गावज्या सोन्या पावरा 78)उदेसिंग विका पावरा 79)मोचडा सोन्या पावरा 80)रडत्या सोन्या पावरा 81)वसंत खाज्या पावरा 82)निलेश वसंत पावरा 83) प्रदीप रेहंज्या पावरा 84)मेरसिंग रेहंज्या पावरा 85)तेरसिंग रेहंज्या पावरा 86)रेल्या रेहंज्या पावरा 87)रेहंज्या खाज्या पावरा 88)मानसिंग रेहंज्या पावरा 89)सखाराम रेहंज्या पावरा 90)सायसिंग खाज्या पावरा 91)कोन्या खाज्या पावरा 92)धाकलसिंग कोन्या पावरा 93)दिलीप कोन्या पावरा 94)अर्जुन रेहंज्या पावरा 95)सायसिंग ....पावरा 96) प्रताप सायसिंग पावरा 97)आठया ओरमा पावरा 98)कांडा भामटा पावरा 99)उदेसिंग खाज्या पावरा 100)सुभाष सिंग्या पावरा 101)रायमल सिंग्या पावरा 102)दिलीप सिंग्या पावरा 103)जितेंद्र जेठ्या पावरा 104)जेलसिंग जेठ्या पावरा 105)सुरेश जेठ्या पावरा 106)अनाज्या भुवटा पावरा 107)संजय अनाज्या पावरा 108)भाईदास अनाज्या पावरा 109)सुकलाल सेल्या पावरा 110)गुलाबसिंग खाज्या पावरा 111)विरसिंग सेल्या पावरा 112)जेमा खाज्या पावरा 113)लेहऱ्या आबदा पावरा 114)मांगीलाल आठ्या पावरा 115)इमन दारख्या पावरा 116)दारख्या लुल्या पावरा 118)दिपीप दारख्या पावरा 119)रवींद्र उदेसिंग पावरा 120)लेहऱ्या आबदा पावरा 121)भाईदास लेहऱ्या पावरा 122)सुरेश सिंग्या पावरा

पावरा लक्ष्मण मोगरा (चर्चा) ००:२२, २३ फेब्रुवारी २०१९ (IST)

आदिवासी क्रांतिवीर-सोमा डोमा आंध[संपादन]

 • आदिवासी क्रांतिवीर सोमा डोमा आंध यांची जयंती !!*
    आदिवासी क्रांतिवीर सोमाजी आंध यांचा
 • जन्म :-9 मार्च 1897* गाव -उमरडा ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ येथे झाला.
    *सोमा डोमा आंध यांचा इंग्रजां विरुद्ध भारतीय स्वातंत्र्यसाठी उठाव:- सन -1930 ते 1943 या कालावधीत केला.आणि इंग्रजाना हादरवून सोडले होते.*
    सोमा डोमा आंध हे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील एक अग्रगण्य स्वातंत्रवीर होते, यवतमाळ नगर परिषदेच्या कार्यालयात जिल्ह्यातील क्रांतीविराची जी सूची आहे आहे त्या मध्ये सोमा डोमा आंध(उमरे) यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.सोमा डोमा आंध; हे आंध जमातीचे एक प्रमुख क्रांतिकारक असले तरी ते भारतभूमीचे थोर सुपूत्र होते.यवतमाळ ते पुसद या मार्गावर 5 किलोमीटर अंतरावर घाटाचा रस्ता आहे .या रस्त्यावर चंदन आणि सागाच्या वृक्षाचे घनदाट जंगल आहे. याच जंगलात *उमरडा(UMRDA)* हे एक छोटेसे आदिवासी गाव आहे याचं गावचे स्वातंत्रवीर सोमा डोमा आंध (उमरे) हे आहेत.
     सोमा डोमा आंध हे लहानपणापासूनच तल्लखं व कुशाग्र बुद्धी चे आणि करारी वृत्तीचे असल्याने कोणीही केलेला अन्याय्य ,अत्याचार त्यांना सहन होत नसे.म्हणून त्यांनी कशाचीही पर्वा न करता स्वतः एकट्यानेच या अन्याया विरुद्ध आवाज उठवला.    सावकार,जमीनदार ,पाटील यांनी भोळ्या आदिवासींना लुबाडून त्यांच्या शेकडो एकर जमीनी बळकावल्या या विरुद्ध पहिला लढा देणारे कोणी असेल तर ते म्हणजे सोमा डोमा आंध .त्यांनी मोठ्या प्रमाणावर आदिवासींवर होणाऱ्या या अन्यायाबद्दल आदिवासी मध्ये जनजागृती निर्माण केली. तेथील  कोलाम,आंध,प्रधान आणि गोंड 

अशा अनेक जमातींना पटवून सांगितले की, हे लोक आपल्या वर कशा प्रकारचे अन्याय्य अत्याचार करतात.आज देखील तेथील गावातील वृध्द लोकं सांगतात की जेव्हा सोमा स्वतंत्र चळवळी च्या वेळी सभेत बोलत असे तेव्हा गावातील व आजूबाजूचे सर्व स्त्रिया, मुले ,माणसे,लेकरं हातातील काम सोडून सोमाजी काय सांगतात हे ऐकायला धावपळ करून येत असत तेंव्हा *सोमाचा एक एक शब्द म्हणजे बाणांचा तिर होता* ,त्यांच्या बोलण्यातून समोरच्या लोकांच्या मनी वीरश्री संचारत असे,ते अजिबात कोणालाही घाबरत नसत,अतिशय निडर वृत्तीचा होते,म्हणून त्याच्या वाट्याला एकटा दुकटा इंग्रच कधीच आड येत नसे.

   *इ.स. १९३२ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील ग्राम धुंदी येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व सोमा डोमा आंध यांनी केले. त्यावेळी त्याना पकडले गेले आणि वाशीम येथील जेलमध्ये टाकले तेथे त्याना सहा महिण्याचा कारावास भोगावा लागला. या लढ्यात त्यांना बाळापूर , मूर्तीजापूर जि.अकोला येथील अनेक आंध क्रांतिकारकांची साथ होती* . 
    *पण दुर्दैवाने त्याची दखल ना आंध जमातीने घेतली किंवा दुसऱ्या कोणत्या जमातीने ही घेतली नाही,आणि शासनाने तर अजिबातच दख़ल घेतली नाही*. *देशाच्या स्वातंत्रप्राप्तीसाठी मातृभूमीचे स्वातंत्र्य हे एकमात्र ध्येय डोळ्यासमोर ठेवून व त्या ध्येयाने प्रेरीत होऊन विदर्भात कोठेही आंदोलन चालू झाले की सोमा वाऱ्यासारखा तिकडे भिरकायचा* .त्यांनी आपल्या *बरचीचा (भाला)* *शस्त्रा सारखा वापर करून अनेक इंग्रजांना अचुक टिपले होते*.
    त्यांना *महात्मा गांधी सेवाग्राम वर्धा येथे आले आहेत असे समजताच सोमा डोमा आंध खुद्द आणि निवडक सहकारी सोबत घेऊन त्यावेळी ते पायी- पायी चालत जाऊन महात्मा गांधीजीनां भेटले व यवतमाळ जिल्ह्यातील स्वतंत्र चळवळी बद्दल त्यांनी गांधी सोबत चर्चा केली होती आणि पुढील दिशा देखील ठरवली होती .त्यानंतर बऱ्याच चळवळी सोमा डोमा आंध नि गाजवल्या ते आपल्या आयुष्याच्या शेवट पर्यंत अन्याया विरुद्ध आवाज उठवत राहिले.आणि इंग्रांशी दोन हात करतांना ते 10 डिसेंम्बर 1943 रोजी शहीद झाले*.

~#अनुवाद# ~ नाव -पावरा लक्ष्मण मोगरा मो.9420076080 तिनसमाळ ता. धडगाव जि. नंदुरबार पावरा लक्ष्मण मोगरा (चर्चा) १७:१३, ९ मार्च २०१९ (IST)

विकी लव्हज् वुमन २०१९[संपादन]

Wiki Loves Women Logo (mr).png

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)

समाजसेवा गीत[संपादन]

💝💝~~समाजसेवा गीत~~💝💝

पहिल्या दिवशी पहिला प्रकार

 गाव आपलं मागे का फार

सर्वच गोष्टीला मायबाप सरकार जो बाळा जो रे जो ||१||

 दुसऱ्या दिवशी दुसरी केली 
 कल्याणकारी योजना आली 

अरे लुचाटानीती लुटून खाल्ली जो बाळा जो रे जो ||२||

  तिसऱ्यांदा माझा देश हा महान
 झाला मोठा रे लोकसंख्येने 

जिकडे तिकडे घाणच घाण जो बाळा जो रे जो ||३||

 चौथ्यांदा माझा गाव हा लहान
 शोभुनी दिसे सुंदर छान 

पंचा ना येथे होता होमान जो बाळा जो रे जो ||४||

 पाचव्यांदा बाबा हालीचे पंच 
 अरे दारू बाजूनी झाले सरपंच

म्हणू लागले तीन होवांचं जो बाळा जो रे जो ||५||

 सहाव्या दिवशी साठ वर्षाचे 
 अनुदान आले निराधारांचे 

चांगभले झाले चोरांचे जो बाळा जो रे जो ||६||

 सातव्या दिवशी साडे-सातीचे
 आले होती हो गोर-गरिबांचे 

भाग मागती दारिद्र्याचे जो बाळा जो रे जो ||७||

 आठव्या दिवशी आठाठी झाली 
 गावातली माणुसकी निघून गेली

गाव हि सारी ओसांड झाली जो बाळा जो रे जो ||८||

 नवव्या दिवशी नमन करून
 सुज्ञ मंडळी बसली चिंतनी

म्हणू या आता विकासाची कानी जो बाळा जो रे जो ||९||

 दहाव्या दिवशी करा धावाधाव
 मन सुधारू आपलं गाव

सांगा कशाला सरकार हवं जो बाळा जो रे जो ||१०||

 कवी लक्ष्मणजी सांगे विनवुनी
 मागे गेलेला न येनां क्षण 

आली या संधी करा हो सोनं जो बाळा जो रे जो ||११||

        पावरा लक्ष्मण मोगरा
    मो.नं.९४२००७६०८०
     मु.तिनसमाळ ता.आक्रणी जि नंदुरबार
पावरा लक्ष्मण मोगरा (चर्चा) २२:१८, १४ मार्च २०१९ (IST)

तिनसमाल गावाला सवजीभाई ढोलकिया भेट[संपादन]

तिनसमाळ (नंदूरबार)- कंपनीतील १२०० कर्मचाऱ्यांना दिवाळी बाेनस म्हणून कार भेट देणारे सुरत (गुजरात) येथील उद्योगपती सवजीभाई ढोलकिया यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तिनसमाळ (ता. धडगाव) गावातील समस्यांची बातमी दैनिक दिव्य मराठीमध्ये वाचली अाणि या गावच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. गावातील शाळेत सौर पॅनल बसवणे,पाड्यांमध्ये सोलर पथदिवे बसवणे, पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नर्मदा नदीतून जलवाहिनी टाकण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तसेच ३० तरुणांना सुरत येथे घर व चांगल्या पगाराची नोकरी देण्याचा प्रस्ताव ठेवला. 'दिव्यमराठी'ची बातमी वाचली अन् धावले आदिवासींच्या मदतीला....

- या गावातील समस्यांविषयी ‘दिव्य मराठी’ने २४ जानेवारीच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली हाेती.  - ही बातमी वाचल्यानंतर सुरत येथील हरिकृष्ण एक्स्पोर्टचे चेअरमन सवजीभाई ढोलकिया यांना इतक्या असुविधांमध्ये लोक खरच जगू शकतात का? हा प्रश्न पडला.  - परिस्थिती जाणून घेण्यासाठी ते सुरत येथून सहकाऱ्यांसह पाठवले. डोंगरदऱ्यात तीन किलोमीटर पायी चालत गावात पोहाेचले.  - गावातील प्रत्येक नागरिकाला ब्लँकेट, चादर, साडी व लहान मुलांना खाऊचे वाटप केले. गावातील चारही पाड्यांना भेट देत भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली.  - शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळेतील शिक्षकांशी चर्चा केली.

- शिक्षकांच्या मागणीनुसार शाळेला सौरऊर्जा संच, डिजिटल वर्ग करून देण्यासह शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे आश्वासन दिले.

गावाला सर्व प्रकारची करणार मदत-

- गावातील अंधार दूर करण्यासाठी चारही पाड्यांवर सोलर पथदिवे बसवले जातील, असे सांगितले.

- त्याच बरोबरच गावातील तीस तरुणांना सुरत येथे निवासी व्यवस्थेसह चांगल्या कंपनीत नोकरी देण्याचा शब्द दिला.  - गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नर्मदा नदीतून जलवाहिनी टाकण्यासाठी येणारा सर्व खर्च उचलण्याची तयारी सवजीभाई डोलकिया यांनी दर्शवली.  - गावातील शेतकऱ्यांच्या मशागतीसाठी बैलजोडी देणे, प्राथमिक आरोग्य केंद्राला आराेग्य किट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.  - आदिवासींनी उत्पादित केलेल्या मालाला मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होतील, असेही सांगितले.


‘दिव्य मराठी’चे आभार-

- ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताने आमच्या दुर्लक्षित गावात देवदूत अवतरला. आदिवासींच्या मरणयातना जाणून घेत सवजीभाई डोलकिया यांनी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.  - सरकार जे काम करू शकले नाही ते काम ‘दिव्य मराठी’च्या एका बातमीमुळे झाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थयांनी व्यक्त केली.

कोण आहेत ढोलकिया-

- सवजीभाई धनजी ढोलकियासुरत येथील पाचवी नापास असलेले जगप्रसिद्ध हिरे व्यापारी आहे.

- त्यांनी १२ रुपयांपासून केली व्यवसायाची सुरुवात. आता सहा हजार काेटींचे मालक आहेत.  - ते सन १९७७मध्ये साडेबारा रुपये घेऊन सुरतला अाले. १० वर्षे हिरे घासण्याचे काम केले.  - त्यानंतर हरिकृष्ण कंपनी सुरू केली. दिवाळीत १२०० कर्मचाऱ्यांना कार, बंगला व दागिने गिफ्ट म्हणून दिले.  - स्वतःच्या मुलांना फक्त भाड्याचे पैसे देऊन संघर्षपूर्ण जीवन जगण्यासाठी त्यांनी पाठवले.


आदिवासींसोबत गायले भजन-

- तिनसमाळ गावात मित्रांसोबत सवजीभाई जंगलात झोपले. रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या खाटेजवळ सर्प निघाला, परंतु अचानक ग्रामस्थांचे लक्ष गेले. त्यामुळे अनर्थ टळला. त्यांनी आदिवासींसोबत रामधून व भजन गायले.

गाव पाहून वाईट वाटले- ढोलकिया

- हरिकृष्ण एक्स्पोर्ट्सचे चेअरमनसवजीभाई ढोलकिया म्हणाले, भास्कर समूहाच्या दिव्य मराठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातमीतून मला तिनसमाळची परिस्थिती समजली.  - मला प्रश्न पडला की आधुनिक भारतात खरच असे गाव आहे का? त्यामुळे खात्री करण्यासाठी गावात आलो.  - आदिवासी समाजाची बिकट परिस्थिती पाहून वाईट वाटले. ग्रामस्थांना भविष्यात अाणखी भरीव मदत करेन.

        वृत्त ~निलेश पाटील
        -पावरा लक्ष्मण मोगरा 
    मु.तिनसमाळ ता.आक्रणी जि नंदुरबार
        


पावरा लक्ष्मण मोगरा (चर्चा) २२:२८, १४ मार्च २०१९ (IST)

रात्री माझं गाव विकताना पाहिलं मुळ कविता - देश विकताना पाहिला कवी प्रदिप भास्कर कोळपे संगमनेर ८८३०३८१४३६[संपादन]

. *रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं* कुठे हजारात, कुठे पाचशेत बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी

 • माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं अचानक साड्या वाटताना दिसलं मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी गरीबाला मी लाचार होताना पाहिलं, रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला

पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला... त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहीला निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा आता त्यांच्या पाया पडताना दिसला गरिबांच्या झोपडीकडे जाताना त्याचे जोडे केवढे घासले पण वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहीला, निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून त्याने तोडलेत गरीबांचे लचके आज दडपशाही मतदानाला आणली गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत* आज माझं गावही वाहिलं, *मटनाच्या* 2 चुऱ्यापाई, पुन्हा 5 वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझ गावं विकताना पाहिलं* कुठे हजारात, कुठे पाचशेत

 • बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

 • सत्य परिस्थितीवर आधारित सुंदर लिखाण ....

मुळ कविता - देश विकताना पाहिला... कवी- प्रदिप भास्कर कोळपे संगमनेर ८८३०३८१४३६

आदिवासीच कल्पवृक्ष महुवा(मुवडा)[संपादन]

■आदिवासींचा कल्पवृक्ष मोह(मुवडा)■

●मराठी नाव :- महू ●हिंदी नाव :- महुवा ●संस्कृत नाव :- मधुक ●इंग्रजी नाव :- Butter tree ●आदिवासी नाव :- मुवडा ●वनस्पतिशास्त्रीय नाव :- Madhuka indica / Bassica latifolia

मोह हा मधकु गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष आहे. तो जंगली वृक्ष आहे.भारतातील उष्ण

प्रदशातल्या पानगळीच्या जंगलात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सह्याद्री, सातपडुा व विध्य पर्वतातल्या जंगलात मोहाची झाडे आढळतात. कमी पावसाच्या कोरड्या व उष्ण हवामानात मोह वाढतो. समशीतोष्ण हवामानातही तो वाढतो. महाराष्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, ओरिसा या राज्यातील अरण्यात मोहाची झाडे आहेत. हिमालयातील टेकड्यांच्या पायथ्यालाही मोह वृक्ष दिसतात . रावी पासून गंडकी नदीच्या खोऱ्यापर्यंत मोहाची झाडे आढळतात. कमीत कमी १ ते ८ डीग्री सेंटीग्रेड व जास्तीत जास्त ४१ ते ४८ सेंटीग्रेड पर्यंतचे तापमान मोहाचे झाड सहन करू शकते. ७५० मिलीमीटर ते १८७५ मिलीमीटर पावसात मोहाची झाडे चांगल्या रीतीने वाढतात. मध्य व उत्तर प्रदेशात आंब्याच्या झाडांच्या खालोखाल मोहाची झाडे वाढलेली दिसतात. दक्षिण भारतातही मोहाची झाडे आहते. मात्र भारतातील वाळवंटी प्रदेशात मोह आढळत नाही. कारण वाळवंटी भागातील उष्णता त्याला सहन होत नाही.मोह डेरेदार वृक्ष आहे तो ४० ते ६० फुट उंच वाढतो. मोहाचे झाडं ६०/७० वर्षांपर्यंत जगते. त्याच्या खोडाचा घेर मध्यम असतो. साल धरुकट-राखत रंगाची असते. तिच्यावर उभे पापद्रुे असतात किवा आडव्या खाचा असतात. साल १.२ सेंटीमीटर जड असते. त्याच्या गाभ्यातले लाकूड लालसर तपकरी असते. मोहाचे लाकूड खूप कठीण व सरळ असते. जाड व टिकाऊ असते. त्याच्यावर हवेचा परिणाम होत नाही. मात्र त्याला कीड लागते. काष्ठकण खूप जवळ जवळ असल्याने करवतीने कापणे खूप अवघड जाते. प्रत्येक क्युबिक फुटास लाकडाचे वजन २५० किलो भरते. मोहाचे पाने लाबोळी असतात. गुळगुळीत असतात. फांदीच्या शेड्यांवर पानांचा झुपका उगवतो.फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मोहाची पाने झडतात. त्या वेळी मोह फुलू लागतो. फुलांचा रंग फिका बदामी असतो.त्यांचा बाह्यकोश मनक्याच्या रंगासारखा दिसतो फुले अर्धा इचं आकाराची असतात. फुले रात्री फुलतात. सकाळी झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो. फुलांचा बहार ओसरल्यावर मोहाच्या झाडास फळे येऊ लागतात. त्याच बरोबर लाल पालवीने मोह बहरतो. फळांच आकार बोरासारखा वाटोळा असतो. फळांचा रंग हिरवा असतो. फळे रसाळ असतात. जनू-जुलैत फळे पिकतात व खाली गळून पडतात. दक्षिण भारतात आगस्ट -सप्टेंबररात फळे गळून खाली पडतात.

■आदिवासींचा कल्पवृक्ष कोकणात जसा नारळ कल्पवृक्ष समजला जातो, तसा मोह सातपुड्यातल्या आदीवासींचा कल्पवृक्ष आहे मोहाच्या फुला-फळांपासून त्यांना रोजगार मिळतो. भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळतात. तसेच फुला फळांचा अन्न म्हणूनही ते उपयोग करतात.बाईघाणीत(चापडा) बीयाचे तेल काढतात. त्यांचा स्वयंपाकात उपयोग करतात. त्याच तेलाचे दिवेही ते पूर्वी जाळायचे. तेल काढल्यावर बियांची पेंड बनविवतात, तिचा खतासाठी उपयोग होतो. मोहाच्या साली पासून रंग बनविवतात. बिया वाटल्यावर तुपा सारखे तेल निघते म्हणून मोहाला इग्रंजीत 'बटर ट्री’ म्हणतात.

■फुलाचा उपयोग मोहाची फुले राना-वनात राहणाऱ्या आदिवावासींच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहेत. उन्हाळ्यात त्यांची उपजीविका मोहाच्या फुलांवर होते. मोहांच्या फुलांत साखर आणि अल्कोहोल चे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मद्य बनवितात. या मद्यात ' ब ' जीवनसत्त्व असते. विवाह व इतर सणांच्या दिवशी मोहाचे मद्य प्राशन करणे आदिवासी पवित्र समजतात. कोणताही आजार झाला की पावरा ,भिल ,ठाकर, कातकरी, कोरकू, गोंड, माडिया या आदिवासी जमाती मोहाच्या दारूचा औषध म्हणून उपयोग करतात.फुलात साखरे बरोबरच कॅल्शियम व इतर जिवनसत्वे असतात. कार्बोहायडेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन व अनेक पोषक द्रव्ये फुलात असतात. आदिवासी तांदळात मोहाची फुले शिजवून खातात. इतर कोणत्याही टॉनिक पेक्षा अशा प्रकारचे अन्न हे उत्तम टॉनिक आहे. त्याचा आदिवासींच्या शरीर पोषणास उत्तम उपयोग होतो.

■एक टन फुलांपासून ३४० लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते. इंजिन चे इधंन म्हणून या अल्कोहोलचा उपयोग होतो. व्हिनेगार बनविण्यासाठी फुलांचा उपयोग होतो. अहमदाबादच्या फूड क्राफ्ट संस्थेने मोहाच्या फुलांपासून जॅम आणि जेली बनविण्याचा गृहउद्योग सुरु केला आहे. विविध उपयोगांसाठी मोहाच्या फुलांना मागणी वाढत आहे.फेब्रुवारी-मार्च मध्ये मोहाची फुले फुलतात. फुलण्यासाठी त्यांना कमी प्रकाश लागतो.ही फुले बहुतेक वेळा रात्री फुलतात. सकाळी खाली पडतात. आदिवासी फुले गोळा करून वाळवतात. बाजारात विकतात.एका झाडापासून त्याच्या वयोमानानसुार ५ पासून ३० किलोपर्यँत फुलांचे उत्त्पन्न मिळते. वीसाव्या वर्षी ३० किलो, तिसाव्या वर्षी ६० किलो, चाळीसाव्या वर्षी ७५ किलो, पन्नासाव्या वर्षी १३५ किलो व साठाव्या वर्षी १४० किलो फुलांचे उत्पन्न मोहाच्या एका झ्दापासून मिळते. भारताच्या मोहाच्या फुलांचे एकूण उत्पन्न २० लाख टन आहे.

■फळांचा उपयोग

जून जुलैत मोहाची फळे पिकतात. फळे गोल असतात. फळात भरपूर रस असतो. फळे पिकल्यावर खाली पडतात.आदिवासी व खेड्या पाड्यातील लोक फळे गोळा करतात. फळे तशीच व शिजवून भाजी करून खातात. फळातही भरपरू प्रमाणात साखर असते. ओल्कॉहोलचे प्रमाणही चांगले असते.एक टन फळांपासून ११० लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते. या शिवाय फळात तेल, इथेयल, टपेंटाईन ओईल असते. सर्वात जास्त प्रमाणात ६७.९% अल्कोहोल असते.

■बियातील तेल

मोहाच्या बियांत २० ते २५% तेल असते. तसेच इतर रसायने असतात. क्रूड, प्रोटीन, फायबर, फास्फरस, राख, पोटाश व इतर प्रोटीन्स मोहाच्या बियांत असतात. लाकडाच्या घाणीत(चापडा) या बियाचे तेल काढतात. आदिवासी भाज्यात व दिव्यासाठी पूर्वी या तेलाचा वापर करायचे. या तेलाचा चार्मोरोग व डोकेदुःखी वरील विविध प्रकारच्या औषधात उपयोग करण्यात येतो. तसेच मेणबत्ती व कन्फेक्शनरी बनविण्यासाठी मोहच्या बियांच्या तेलाचा वापर केला जातो.धुण्याचा साबण बनविण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोहाचे तेल तुपा सारखे दिसत असल्याने शुद्ध तुपात भेसळ करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. धुण्याचा साबण बनविण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. साबण बनविणाऱ्या कारखान्यांकडून या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे अल्कोहोल व स्टॅटिक ऍसिड बनविण्यासाठी मोहाच्या बियांचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. कार्बन व डिंक बनविण्यासाठीही मोहाच्या बिया वापरतात.बियांतून तेल काढल्यावर त्यांच्या चोथ्याची पेंड बनविवतात. या पेंडीचा उपयोग खत म्हणून शेतात केला जातो. पेंडीत पिकांना लागणारी पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. सल्फेट व नायट्रोजन खतात पेंड मिसळून पिकांना घालतात, त्यामळुे पिकांची वाढ जोमदार पणे होते. मोहाच्या बियांची पेंड उत्तम सेंद्रिय खत आहे.

मोहाच्या पेंडीचा धूर केल्यास साप व उपद्रवी किडे-कीटक पळतात, घराजवळ येत नाहीत असा 

आदिवासींचा विश्वास आहे.सर्प दंशावरही ते पेंडीचा उपयोग करतात. पाण्यातल्या माशांना भुलवण्यासाठी आदिवासी पाण्यात पेंडीचा भुसा टाकतात.

■एका मोहाच्या झाडापासून आकारमाना नुसार ५ ते २५ किलो वाळलेल्या बिया मिळतात.■

■साल आणि पाने मोहाच्या सालीत टॅनिन असते. सालींचा उपयोग रंगासाठी करतात. मोहाची पाने पाळीव प्राण्यां साठी उत्तम खाद्य आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदशे या भागांतील शेतकरी गायी गुरांना मोहाच्या पानांचा सकस आहार देतात.त्यामळुे दुभती जनावरे भरपूर दूध देतात. असा त्यांचा अनभुव आहे.ज्या भागात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासते त्या भागात मोहाची पाने चाऱ्याची गरज भागवण्यास उपयोगी पडतात.पानांचे द्रोण व पत्रावळी आदिवासी तयार करतात. लग्न व सणांच्या दिवाशी या पत्रावळी व द्रोणांना चांगली मागणी असते. ५ ते १० रुपये शेकडा भाव मिळतो.

■मोहाचे लाकूड

मोहाचे लाकूड सागा पेक्षाही कठीण असते. परंतु किडीमुळे त्याचा टिकाव लागत नाही, हा मोठा दोष

मोहाच्या लाकडात आहे. मोहाच्या झाडात १७% टॅनिन असते. त्याचा रंगासाठी उपयोग होतो. ०.१६ mm आकाराचा फायबरचा धागाही लाकडापासून मिळतो. पेपर बनविण्यासाठी लागणारा लगदाही या लाकडाचा बनविवतात. फर्निचर, नावा, बैल गाड्यांची चाके, छोटेछोटे लाकडी पूल ,चहाची खोकी, घरांचे खांब व तुळ्यांसाठी मोहाच्या लाकडाचा उपयोग होतो. परंतु या कारणासाठी मोहाचे झाड सहसा तोडले जात नाही. कारण वर्षानुवर्षे, पाने फुले, फळे व बिया यांचे उत्पन्न मोह देतो. लाकडापेक्षा त्याचे हे इतर उत्पन्न अधिक महत्वाचे आहे.

आदिवासी मोहाच्या झाडाला पवित्र मानतात. आपला अन्नदाता मानतात. म्हणून ते मोहाचे झाड तोडत नाहीत. जन्म, मृत्यू, विवाह, सणांच्या दिवशी मोहाच्या झाडाची पूजा करतात. लग्नाच्या दिवशी (काही क्षेत्रात)गाणी म्हणत मोहाच्या झाडाची फांदी तोडून आणतात. (काही क्षेत्रापुरते )फांदी मांडवात रोवतात.नवरा-नवरी या फांदीची पूजा करतात. आपल्या सुखी संसारासाठी मोहाच्या झाडाची प्रार्थना करतात.

■मोहाचे औषधी उपयोग

अनेक आयुवेदीय औषधात मोहाचा उपयोग केला जातो. मोहाच्या लाकडातील टॅनीनचा

जखमे वरील उपचारा साठी उपयोग केला जातो. मोहाच्या खोडातून व फुलांतून पांढरा चीक(डिंक) निघतो. या चिकाचा उपयोग संधीवातावर उपचार करताना होतो. बियांपासून निघणारे तेल सांधेदुखी, डोकेदुखी व इतर दुःखण्यांवर वापरतात. गोवर, कांजण्या, फोड यांवरही आदिवासी तेलाचा उपयोग करतात

       ~ पावरा लक्ष्मण मोगरा -
    मु.तिनसमाळ ता.धडगाव जि. नंदुरबार
   मो.नं.9420076080 पावरा लक्ष्मण मोगरा (चर्चा) १७:४३, ३१ मार्च २०१९ (IST)

तिनसमाळ गाव (वसाहत) स्थापना इतिहास[संपादन]

◆तिनसमाळ गावाची (वसाहत)स्थापना◆ खाज्या वेस्ता पावरा यांची वसाहत चांदसेली माळ व हुन्या वेस्ता पावरा सोन बु|| या दोघा भावांना असे वाटले कि (ढुठ्ठल ) हे फुंदा डुडवा यांचा राज होता.त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या राज जागा,भूमी आपल्यालाच मिळायला पाहिजे असे खाज्या व हुन्या यांना वाटत होते .खाज्या आणि हुन्या यांनी सरकारकडे वारंवार जमिनी मिळविल्यासाठी अर्ज केले कि आमच्या पूर्वजांची (फुंदा डुडवा) यांची जमीन आम्हाला पाहिजे.धडगाव-नंदुरबार हुन वारंवार अर्ज केले पण सरकारने त्यांच्या अर्जाकडे लक्ष दिले नाही.

    त्यानंतर सरकारी वनविभागाच्या कर्मचारी वसाहतीत आला होता.त्याला दारू मटनाचं जेवण खाऊ घातलं आणि त्यांना सांगितले की आमच्या पूर्वजांची जमीन आम्ही शासनाकडे वारंवार अर्ज केले. पण ते झालं नाही.मग त्या कर्मचाऱ्यांनी खाज्या यांना सांगितले की चला माझ्यासबोत .खाज्या यांनी त्यांच्याबरोबर अर्जाचे सर्व कागदपत्रे घेऊन वाट धरली .नाशिक ला अर्ज केला,मुंबईला अर्ज केला.त्यानंतर एका आठवड्यात गावात वसाहत करून राहण्याची (हुकूम)परवानगी मिळाली.२९जणांना वसाहतीची परवानगी व सातबारा मिळाला .
    पुढे खाज्या वेस्ता पावरा सर्वात पहिले वसाहत केली.त्यानंतर हुन्या वेस्ता पावरा त्याच बरोबर सोन्या वेस्ता पावरा ,थावऱ्या पावरा,आरशा नान्या पावरा,डुंगऱ्या पावरा,त्यानंतर विका वेस्ता पावरा ,भुवटा पावरा ,वाहऱ्या पावरा इ.चे वसाहत बसली.
    इ.स.१९५६ मध्ये गावाची स्थापना झाली.त्यानंतर १९६२ मध्ये या ठिकाणी वसाहत बसली .आणि १९७३ साली गावाला महसुली दर्जा मिळाला.पाच पाड्याचा या गावाचे नाव 'तीसळ' म्हणजे (तिनस) या वृक्षावरून पडले.

(ढुठ्ठलपाडा,घुडानचापडा,पाटीलपाडा,दुकानपाडा,पलासपाणी) तिनसमाळ गावात मोठ्या प्रमाणात तिसळचे वृक्ष आहेत .

📰सातपुड्यातील निसर्गरम्य गाव तिनसमाळ ता. धडगाव जि. नंदुरबार📰

     नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतात धडगाव तालुक्यापासून १७ किमी. वर असलेले तिनसमाळ हे एक निसर्गात वसलेले गाव आहे. तिनसमाळ गावाची स्थापना सन.१९५६ मध्ये झाली. त्यानंतर १९६२ मध्ये या ठिकाणी वसाहत बसली. तिनसमाळ गावाला १९७३ साली महसुली दर्जा म्हणून मिळाला. पाच पाड्याचा या गावाचे नाव 'तीसळ' म्हणजे(तिनस)या वृक्षावरून पडले आहे. तिनसमाळ गावात मोठ्या प्रमाणात तिसळचे वृक्ष आहेत. या वृक्षावरून नांगर, वखर, अशाप्रकारची कृषी अवजारे तयार केली जातात.
      तिनसमाळ गावाची लोकसंख्या 2011 च्या जनगणणेनुसार 601 एवढी आहे. तिनसमाळ गावात 73ते 95 अशी लहान- मोठी कुटुंबे आहेत. त्यापैकी 35 कुटुंबे हि स्थलांतरित कुटुंबे आहेत. तिनसमाळ गाव हे 128.62 हेक्टर जमिनीवर वसलेले आहे. म्हणजेच 320.62 एकर जमिनीवर तिनसमाळ गाव वसलेले आहे. त्यापैकी 72.52 हेक्टर महसुली जमीन आहे. तिनसमाळ गाव हे पाडा पद्धतीने वसलेले असून या गावात पाच पाडे आहेत.

(ढुठ्ठलपाडा,घुडानचापडा,पाटीलपाडा,दुकानपाडा,पलासपाणी)

       तिनसमाळ हे गाव महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या तिन्ही राज्यांचा सीमावर्ती भागात आहे.गावाचा उत्तर दिशेला आणि पश्चिमेला नर्मदा नदी असून, पूर्व दिशेला घनदाट जंगल व दक्षिणेला हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. तिनसमाळ गावापासून राजबर्डी टपाल कार्यालय 30 किमी. वर धडगाव पोलीस ठाणे 18 किमी वर सोन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 15 किमी.वर तर रोषमाळ ग्रामपंचायत 18 किमी. वर आहे. अशा प्रकारचे तिनसमाळ हे गाव आगळे-वेगळे निसर्गात वसलेले आहे.   
    --  लक्ष्मण मोगरा पावरा (तिनसमाळ)
     मो.नं.९४२००७६०८० पावरा लक्ष्मण मोगरा (चर्चा) १०:४८, २५ एप्रिल २०१९ (IST)