सदस्य:Viklesh Shende

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूनम यादव (जन्म : २४ ऑगस्ट १९९१) ही भारतीय महिला क्रिकेट संघासाठी खेळणारी एक क्रिकेटपटू आहे. एप्रिल २०१३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सामन्यातून (WT20I) तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पूनमने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १६ नोव्हेंबर २०१४ रोजी केले, तर १२ एप्रिल २०१३ला बांगलादेशविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामान्यामधून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले.[१] २०१३-१४पासून भारतासाठी खेळत असलेल्या पूनमने आजवर एक धारदार गोलंदाज म्हणून स्वतःची ओळख कायम केली आहे. तिचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झालाआणि तिने आजवर विविध प्रादेशिक संघांचे प्रतिनिधित्व केलेले आहे. २०१९ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी तिला अर्जुन पुरस्काराने प्रदान केला होता.[२]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी[संपादन]

पूनमची उंची ४ फूट ११ इंच आहे. आग्रा येथील एकलव्य स्टेडियममध्ये सराव करणारी ती एकमेव महिला खेळाडू होती. तिथे ऑफस्पिन फिरकीपटूंची कधीच कमतरता नव्हती, मात्र लेग स्पिन करू शकणारी ती मैदानातील एकमेव गोलंदाज होती आणि तीसुद्धा महिला. [३][1] पूनमचा जन्म २४ ऑगस्ट १९९१ रोजी झाला. तिच्या आईचे नाव मुन्नीदेवी आहे आणि तिचे वाडील रघुवीर सिंह यादव हे एक लष्करी अधिकारी आहेत. तिचे कुटुंब त्यांच्या गावाहून आग्रा शहरात राहायला आले, तेव्हा पूनमला क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली. पूनम तिच्या कमी उंचीचा फायदा घेत फलंदाजांच्या अगदी जवळ बॉल टाकायची, ज्यात फलंदाज अडकून विकेट जायची. सुरुवातीला तिचे कुटुंब तिच्या क्रिकेटमधल्या महत्त्वाकांक्षेबद्दल फारसे अनुकूल नव्हते, पण नंतर तिने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपलं स्थान राज्याच्या संघात पक्के केले.

कारकीर्द आणि यश[संपादन]

प्रथम पूनमची निवड केंद्रीय झोन या प्रादेशिक संघात झाली. नंतर ती उत्तरप्रदेश संघासाठी खेळू लागली, आणि सध्या ती देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये रेल्वेच्या संघाचे प्रतिनिधित्व करते. [४] पूनमने तिचे टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण ५ एप्रिल २०१३ ला आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण १२ एप्रिल २०१३ ला बांगलादेश विरुद्धच्या मालिकांमधून केले. [3] नोव्हेंबर २०१४मध्ये तिने तिचा पहिला आंतरराष्ट्रीय टेस्ट सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. [4] २०१७ विश्वचषकात पूनमच्या "गुगली"ने फलंदाज चकित होऊ लागले, आणि लवकरच तीच तिची खास शैली बनली. २०१८च्या आईसीसी महिला ट्वेंटी२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा मान एका खेळाडूबरोबर वाटून घेतला. सप्टेंबर २०१८मध्ये तिच्यापेक्षा जास्त अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू झुलन गोस्वामीला मागे टाकत ती टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली. [1] पूनमला २०१८-१९मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआईने सुद्धा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटरचा खिताब बहाल केला. २०२०च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात पूनमची कामगिरी महत्त्वाची मानली जाते. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा आदर्श संघ जाहीर केला, तेव्हा त्यात पूनम ही एकमेव भारतीय क्रिकेटपटू होती. [५] १८ सामन्यांमध्ये २८ विकेट्स घेत पूनम ही टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू आहे. तिने प्रतिषटक ५.६ धावा दिल्या आहेत. या आकर्षक कामगिरीमुळे टी-२० विश्वचषकात विकेट घेणाऱ्या महिलांच्या आयसीसी यादीत पूनम ७व्या स्थानावर आहे. [६]

पुरस्कार[संपादन]

२०१९मध्ये तिला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. [3]

स्ंदर्भ[संपादन]

  1. ^ "Poonam Yadav". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-02-01.
  2. ^ "Live Cricket Scores & News International Cricket Council". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
  3. ^ "BBC News हिंदी" (हिंदी भाषेत).
  4. ^ Cricket, Team Female (2019-08-24). "The inspiring cricket journey of Poonam Yadav | Struggles | Career | Rankings | Stats | Arjuna Award". Female Cricket (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
  5. ^ MelbourneMarch 9, Indo-Asian News Service; March 9, 2020UPDATED:; Ist, 2020 13:35. "Poonam Yadav lone Indian in Women's T20 World Cup Team of the Tournament, Shafali Verma 12th woman". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  6. ^ "ICC Women's T20 World Cup Cricket Team Records & Stats | ESPNcricinfo.com". Cricinfo. 2021-02-17 रोजी पाहिले.