Jump to content

सदस्य:अभय नातू/१-१-१९ लक्ष्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१ जानेवारी, २०१९ या दिवसाला अंदाजे ५ महिने आहेत. तोपर्यंत मराठी विकिपीडियाची प्रगती खालील निकषांवर व्हावी -

  1. लेखसंख्या - ५२,००० - २२ डिसेंबर, २०१७ रोजी ५०,००० लेखांचा टप्पा पार केल्यावर आता लेख वाढविण्याची गती कमी झाली तरी चालेल. त्या लेखांमधील गुणवत्ता वाढली पाहिजे. पुढील पाच महिन्यांत अंदाजे ४०० किंवा सरासरी रोज ३-४ नवीन लेख तयार व्हावे. याच बरोबर पूर्वी तयार केलेले निकामी, निरुपयोगी लेख काढले जावेत. दोन्हीमध्ये घाई किंवा आततायीपणा करू नये.
  2. आशयघनता - हा आकडा मराठी विकिपीडियावरील संपादनांची वारंवारता व लेख नसलेली पाने आणि लेखांची संख्या यांच्यातील ढोबळमानाने गुणोत्तर दाखवतो. सध्या मराठी विकिपीडियाची आशयघनता (Edits per Article*(Pages - articles)/Articles * (1 - Articles per Page)) = ७२.२८० इतकी आहे. समीकरणाकडे लक्ष दिल्यास लक्षात येते की लेख नसलेली पाने (वर्ग, साचे, विकिपीडिया, सहाय्य, चावडी) यांच्यावर संपादनांइतकाच किंवा अधिक भर आहे. याला अनेक कारणे आहेत तरी याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. यात आकडा गाठणे हे महत्वाचे नसून हा आकडा गाठताना जो आशय तयार होईल, याचे महत्व जाणून घेणे महत्वाचे आहे. १ जानेवारी, २०१८ रोजी हा आकडा ७५.००० वर पोचावा.
  3. छोटी पाने - आज मराठी विकिपीडियावरील १,००० सगळ्याच छोटी पाने १६७ बाइट किंवा त्याहून लहान आहेत तर सगळ्यात छोटे १०,००० लेख ५९७ बाइट किंवा त्याहून लहान. असे लहान लेख असणे हे चुकीचे नाही. असे लेख उदयोन्मुख असू शकतात, त्या विषयावर मजकूरच नाही परंतु महत्व आहे...अशी अनेक कारणे याला आहेत. असे असताही अशा लेखांकडे लक्ष ठेवून हा आकडा ६२५ वर आणावा.
  1. धोरणे - मराठी विकिपीडियाची धोरणे हा सतत उत्क्रांत होणारा विषय आहे आणि त्याला आकड्यांचा निकष लावणे योग्य नाही. असे असताही धोरणे असल्याने विकिपीडियाचा कारभार सुरळीत चालेल आणि त्यायोगे संपादकांना रोजच्या वादावादींमधील जाणारा वेळ लेख आणि गुणवत्ता वाढविण्यात खर्च करता येईल हे ही तितकेच खरे. मराठी विकिपीडियावरील धोरणांवरील चर्चा सिव्हिल[मराठी शब्द सुचवा] आणि मुद्देसूद चालू रहावी.

या लक्ष्यांमध्ये तुम्हाला काही भर घालायची असल्यास खाली लिहावे.

@Tiven2240, V.narsikar, आर्या जोशी, Sureshkhole, आणि संदेश हिवाळे: @Pushkar Ekbote, Aditya tamhankar, Pooja jadhav, आणि सुबोध कुलकर्णी: