सत्य येशू प्रार्थनास्थळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सत्य येशू प्रार्थनास्थळ (True Jesus Church) हे एक स्वतंत्र असे प्रार्थनास्थळ (चर्च) असून त्याची स्थापना १९१७ साली चीनमधील बीजिंग ह्या शहरात झाली. युंग-जी लिंग हे सध्याचे स. ये. प्रा.चे निवडून आलेले सचिव आहेत. सध्या ह्या मान्यतेचे सहा खंडात मिळून एकूण १६ लाख अनुनायी आहेत. हे प्रार्थनास्थळ ही एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या ख्रिस्ती संप्रदायाच्या व चीनी संस्कृतीच्या मिलनाची परिणीती आहे. ह्या प्रार्थनास्थळाची वननेस पेंटेकोस्टलच्या (Oneness Pentecostal) सिद्धांतावर श्रद्धा आहे.

दहा मुख्य तत्त्वे व मान्यता[संपादन]

दिव्यात्मा[संपादन]

"त्याने स्वतः सांगितलेल्या धार्मिक गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर आपल्या वंशजांना या पृथ्वीवर "स्वर्गाचे राज्य" मिळायला काहीच हरकत नाही."

बाप्तिस्मा[संपादन]

"पाण्याने बाप्तिस्मा हा विधी पापांपासून मुक्ती आणि पुनर्जीवनासाठी केला जातो. बाप्तिस्मा सहसा वाहते पाणी जसे नदी, समुद्र किंवा धबधबा अश्या ठिकाणी करण्यात येतो. बाप्टीस्ट ज्याच्यावर आधीच पाण्याने बाप्तिस्मा झालेला आहे आणि होली स्पिरीट, भगवान येशूच्या नावाने ही विधी पार पाडतात. ज्या व्यक्तीवर हा विधी पार पाडतात, तो व्यक्ती पाण्यात पूर्णपणे बुडालेला असतो, त्याचे मस्तक झुकलेले आणि चेहरा खाली असतो."

पादप्रक्षालन[संपादन]

"पाय धुण्याच्या विधी मुळे मनुष्याला भगवान येशूचा भाग बनण्यास मदत होते. ह्या विधी मुळे मनुष्यास प्रेम, दैवी शक्ती, माणुसकी, माफ करणे आणि कर्म ह्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत होते. प्रत्येक मनुष्य ज्याच्या वर पाण्याने बाप्तिस्मा हा विधी केला जातो, त्याचे पाय भगवान येशूच्या नावाने धुणे जरूरी असते."

पवित्र सहभोजनविधी[संपादन]

"पवित्र समागम भगवान येशूच्या मृत्यूच्या आठवणीमध्ये पाळला जातो. हा दिवस आपल्याला ईश्वराचा अंश बनण्यासाठी मदत करतो, त्यामुळे आपले आयुष्य कायमस्वरूपी राहिल व शेवटच्या दिवशी मोक्ष मिळेल. हे संस्कार जितक्या जास्त वेळा होतील तितके चांगले व या संस्कारांसाठी फक्त एक कोंडा रहित पोळी व द्राक्षांचा रस यांचा उपयोग केला गेला पाहिजे."

पवित्र सब्बाथ दिवस[संपादन]

"आठवड्याचा सातवा दिवस (शनिवार - सब्बाथचा दिवस) हा पवित्र दिवस (Holy Day) असून पापप्रक्षालनाचा (sanctification) दिवस आहे. ईश्वराने केलेले सृष्टीचे निर्माण व तिचे रक्षण यांचे या दिवशी स्मरण करून उरलेल्या आयुष्यात शांतता व सुबत्ता लाभावी म्हणून प्रार्थना करावी."

येशु ख्रिस्त[संपादन]

येशू ख्रिस्त, ज्याने मानवरूप धारण केले, पाप्यांच्या मुक्तीसाठी ज्याने क्रुसावर मृत्यू पत्करला, तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गावर विराजमान झाला. केवळ तोच मानवजातीचा तारणहार आहे, तोच स्वर्ग व पृथ्वीचा निर्माता आहे आणि एकमेव खरा देव आहे.

पवित्र बायबल[संपादन]

जुन्या व नव्या कराराचा समावेश असलेला बायबल हा ग्रंथ देवाने प्रेरित केलेला आहे, हा ग्रंथ म्हणजे एकमेव ग्रांथिक सत्य असून ख्रिश्चनांच्या जगण्यासाठी प्रमाण आहे.

मोक्ष[संपादन]

"ईश्वराच्या कृपादृष्टीवर (grace of god) जर श्रद्धा (faith) ठेवली तर मोक्ष (salvation) नक्कीच प्राप्त होतो. फक्त धार्मिकता, देवावर विश्वास व मनुष्यांवरचे प्रेम याची गरज आहे."

चर्च[संपादन]

"हे चर्च, जे भगवान येशू ख्रिस्ताने बांधले आहे, जे 'नंतरच्या पावसात' धार्मिक भावनेतून तयार झाले आहे, हे अपोस्टोलिक काळातील पुनर्निर्माण केलेले खरे चर्च आहे".

अंतिम न्याय[संपादन]

"येशु ख्रिस्ताचा दुसरा अवतार हा शेवटच्या दिवशी होईल, जेव्हा तो जगाचे परिक्षण करण्यास स्वर्गातून पृथ्वीवर येईल. जे खरोखर सद्वर्तनी आहेत त्यांना अमरत्व प्राप्त होईल व जे पापी आहेत त्यांचा कायमचा विनाश होईल."