Jump to content

सत्यजित तांबे पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सत्यजीत तांबे पाटील
चित्र:Satyajeet Tambe Patil,2017.jpg

आमदार,नाशिक पदवीधर मतदार संघ
विद्यमान
पदग्रहण
०२/०२/२०२३
मागील डॉ.सुधीर तांबे

कार्यकाळ
२०१८ – २०२२

कार्यकाळ
२०११ – २०१८

सदस्य जिल्हा परिषद, अहमदनगर
कार्यकाळ
२००७ – २०१७

जन्म २७ सप्टेंबर, १९८३ (1983-09-27) (वय: ४१)
संगमनेर
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी डॉ. मैथिली तांबे
निवास संगमनेर
संकेतस्थळ www.satyajeettambe.com

परिचय

[संपादन]

सत्यजीत सुधीर तांबे (जन्म- 27 सप्टेंबर 1983) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख युवा नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. युवक काँग्रेस ही जगातील सर्वात मोठी आणि जुनी लोकशाही युवा संघटना आहे.

ते युवा राजकारणात खूप सक्रिय आहेत आणि जास्तीत जास्त तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर त्यांचा भर आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

[संपादन]

सत्यजीत तांबे यांचा जन्म संगमनेर येथे डॉ. सुधीर तांबे (महाराष्ट्र विधानपरीषद सदस्य) आणि श्रीमती दुर्गाताई तांबे (नगराध्यक्षा- संगमनेर नगरपरिषद) यांच्या पोटी झाला. त्यांचे आजोबा भाऊसाहेब थोरात हे थोर स्वातंत्र्यसैनिक आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या प्रणेत्यांपैकी एक होते. उत्तर महाराष्ट्रात आणि आसपासच्या परिसरातील समाजकारणात सक्रिय सहभाग असलेल्या एका उच्चशिक्षित कुटुंबातून ते येतात. महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. सत्यजीत तांबे हे व्यवस्थापन व राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर आहेत. अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील जॉन एफ केनेडी स्कूलमध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे.

राजकीय कारकीर्द

[संपादन]

सत्यजीत तांबे यांनी 2000 मध्ये काँग्रेस कार्यकर्ता म्हणून तळागाळातील राजकारणापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2007 मध्ये वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आणि जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळविणारे सर्वात तरुण सदस्य बनले. ते 2017 पर्यंत जिल्हा परीषद सदस्य होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 'वॉटर एटीएम' आणि 'एक दिवस शिक्षणाचा' असे अनेक उपक्रम राबवले.[][][]

2018 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अमित झनक आणि कुणाल राऊत यांना पराभूत करून ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.[ संदर्भ हवा ] अध्यक्ष या नात्याने त्यांनी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राच्या राजकारणात दाखल घेण्यायोग्य शक्तीत रूपांतर केले. त्यांच्या कार्यकाळात 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी राबविलेल्या 'सुपर 60' या उपक्रमामुळे महाराष्ट्र काँग्रेसला गेल्या निवडणुकीत गमावलेल्या 28 जागा जिंकण्यास मदत झाली.[ संदर्भ हवा ] त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र 'युवकांचा जाहीरनामा'ही काढला. त्यांच्या कार्यकाळात 'सुपर 1000', पूरग्रस्तांना मदत व साहाय्य आणि कोविड-19 हेल्पलाइन यांसारखे अनेक यशस्वी उपक्रमही राबवले गेले.[ संदर्भ हवा ]

सुरुवात

[संपादन]

2000 साली NSUIच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश

NSUI - 2000 ते 2007 पर्यंत ते नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)चे महाराष्ट्राचे सरचिटणीस होते. जिल्हा परिषद- 2007 ते 2017 पर्यंत ते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या स्थानिक प्रशासकीय मंडळाचे सदस्य होते.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (MPYC)- सत्यजीत तांबे यांची युवकांमधील वाढत्या लोकप्रियतेच्या जोरावर ते 2007 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनले, हे पद त्यांनी 2011 पर्यंत भूषवले. तरुणांना एकत्रित करण्याच्या त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांची 2011 ते 2014 या काळात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. पुढे 2018 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

जवाहरलाल नेहरू युवा केंद्र- 2009 ते 2014 या काळात ते जवाहरलाल नेहरू युवा केंद्राचे सदस्य होते. या काळात त्यांनी दिवंगत डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्यासारख्या अनेक नेहरूवादी दिग्गजांसह काम केले. [१][permanent dead link]


सामाजिक योगदान

[संपादन]

ते 'जयहिंद लोकचळवळ' ही संस्था चालवतात. या संस्थेचा उद्देश लोकांमध्ये त्यांचे हक्क आणि कर्तव्यांबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे. संस्था समाजातील दुर्बल घटकांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय, आर्थिक आणि इतर मदत देखील करते.

त्यांच्या सामाजिक कार्याचा थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे-

  • अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या बेरोजगार युवकांसाठी एमआयटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'युवा मंच'च्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचे आयोजन.
  • यशस्वी युवकांचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जैन युवा मंचच्या माध्यमातून युवा कल्याण शिबीर.
  • जानेवारी 2003 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी 'जैन महिला मंच' स्थापन करण्यात हातभार लावला.
  • गेल्या अनेक वर्षांपासून ते जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहेत.
  • 'जय हिंद युवा ट्रीप' या उपक्रमाद्वारे दरवर्षी शहरांच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी ते तरुणांना सहलीवर घेऊन जातात.
  • ते पर्यावरण जागृती रॅली देखील काढतात. या माध्यमातून ते लोकांना पर्यावरणाचे महत्त्व आणि हवामान बदल रोखण्याकरिता लोकांनी हातभार लावावा यासाठी लोकांना जागरूक करण्याचे काम करतात.
  • संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात निरोगी पर्यावरणासाठी वृक्षारोपण मोहीमही ते राबवत आहेत.
  • 'युवा शेतकरी संमेलना'द्वारे तरुण शेतकऱ्यांना ओळख मिळवून देण्याचे काम केले जाते आणि विविध पुरस्कारही दिले जातात.

लोकसहभागातून 'लाफ्टर चॅलेंज शो', 'फिटनेस क्लब', 'स्वच्छता मोहिम', 'सरपंच संसद' आणि यांसारख्या इतर अनेक उपक्रमांचे आयोजन ते सातत्याने करत असतात.

  • तरुणांना विविध खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता ते जय हिंद क्रीडा महोत्सव देखील आयोजित करतात.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

सत्यजीत तांबे यांचा विवाह डॉ. मैथिली तांबे यांच्याशी झाला असून त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे.

स्वारस्य

[संपादन]

सत्यजीत तांबे यांचे लक्ष शहरी विकास, युवा सक्षमीकरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर आहे. 2016च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. ते एक उत्तम वाचक असून स्तंभलेखनही करतात. त्यांनी 'आंदोलन' नावाचे एक पुस्तक देखील लिहिले आहे, जे भारतातील आंदोलनांच्या माहितीचा एक ऐतिहासिक दस्तऐवज असून आंदोलनांची संस्कृती आणि महत्त्व सांगते. त्यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजन यांच्या शहरीकरण आणि लोकसहभागावरील 'सिटीझनविले' या पुस्तकाचे मराठीत भाषांतरही केले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ author/online-lokmat. "...तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव झाला असता - तांबे". Lokmat. 2019-03-25 रोजी पाहिले.
  2. ^ author/online-lokmat. "'घराणेशाहीची परीक्षा राजकारणातच असते, इतर क्षेत्रात नाही'". Lokmat. 2019-03-25 रोजी पाहिले.
  3. ^ author/online-lokmat. "माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही; पार्थ पवारचं सत्यजीत तांबेंकडून स्वागत". Lokmat. 2019-03-25 रोजी पाहिले.

४) काँग्रेसला पाठिंबा देणार की भाजपाला?’, सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं