सकवारबाई
महाराणी सकवारबाई भोसले | ||
---|---|---|
महाराणी | ||
मराठा साम्राज्य | ||
अधिकारकाळ | १६७४ - १६८० | |
राजधानी | रायगड | |
पूर्ण नाव | सकवारबाई शिवाजीराजे भोसले | |
पदव्या | महाराणी | |
पूर्वाधिकारी | महाराणी सोयराबाई | |
उत्तराधिकारी | महाराणी येसूबाई | |
पती | छत्रपती शिवाजी महाराज | |
संतती | कमळाबाई पालकर | |
राजघराणे | भोसले | |
चलन | होन |
महाराणी सकवारबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. या गायकवाड घराण्यातील होत्या. यांना एक मुलगी होती. तिचे नाव कमळाबाई असे होते. तिचा विवाह नेताजी पालकर यांचा पुत्र जानोजी पालकर यांच्याशी झाला.
सकवारबाईंना एक भाऊ सखोजी गायकवाड असल्याचा उल्लेख दक्षिण दिग्विजय मोहिमेतून परतत असतांना मिळतो, ज्यात बेलवडी ची राणी मल्लम्माचे प्रकरण येते, या मल्लमा उर्फ सावित्रीबाई चा उपमर्द केला म्हणून छत्रपती महाराजांनी नात्यागोत्याचा विचार न करता सखोजी गायकवाड चे डोळे काढण्याचे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले होते.
सोयराबाईंच्या मृत्युनंतर सकवारबाई ह्या मराठा साम्राज्याच्या राजमाता झाल्या. १६८९ साली संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगड जेव्हा मुघलांच्या ताब्यात आला. तेव्हा महाराणी येसूबाई, महाराणी जानकीबाई, युवराज शाहूराजे यांच्यासोबत राजमाता सकवारबाई यांना देखील कैद झाली. पुढे मुघलांच्या कैदेतच त्यांचा मृत्यू झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |