सआदत हसन मंटो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सआदत हसन मंटो
जन्म मे ११, १९१२
मृत्यू जानेवारी १८, १९५५
लाहोर, पाकिस्तान
राष्ट्रीयत्व पाकिस्तानी
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा उर्दू
साहित्य प्रकार लघुकथा

सआदत हसन मंटो (मे ११, १९१२ - जानेवारी १८, १९५५) हे एक उर्दू साहित्यिकलघुकथाकार होते. त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्ऱ्य, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते. [१] लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी, व इतर फुटकळ साहित्य लिहिले.[२][३] मंटो याच्या टोबा टेकसिंह या कथेवर एक चित्रपट निर्माणाधीन आहे. (२००९ साल)[४]

मंटो यांचा जन्म लुधियाना जिल्ह्यातील समराला इथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमृतसर इथे झाले. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी व्हिक्टर ह्युगो यांच्या The Last Days of a Condemned Man या कादंबरीच्या अनुवादाने केली. या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर व्हिक्टर ह्यूगो, मॅक्झिम गॉर्की, आंतोन चेखव, इत्यादि फ्रेंचरशियन लेखकांचा प्रभाव होता.[५]

भारताच्या फाळणीनंतर मंटो जानेवारीमध्ये मुंबई सोडून लाहोरला गेले. मंटोच्या आयुष्याची अंतिम वर्षे त्यांच्यासाठी आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने हलाखीची होती, परंतु त्यांचे सर्वोत्कृष्ट लिखाण याच काळात झाले.[५] मंटो यांचा मृत्यू जानेवारी १८, १९५५ रोजी लाहोर इथे झाला.

पाकिस्तानी टपाल खात्याने मंटोंच्या सन्मानार्थ जानेवारी १८, २००५ रोजी एक टपाल तिकिट प्रकाशित केले.[६]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. भारतीय साहित्याचे निर्माते:सआदत हसन मंटो. साहित्य अकादमी. 
  2. Author Lounge: Saadat Hasan Manto. Penguin Books.
  3. Sadat Hasan Manto: A biographical Sketch. Digital South Asia Library.
  4. Aamir Khan, Kate Winslet to work together on partition film. ExpressIndia.
  5. ५.० ५.१ Manto, Saadat Hasan.
  6. Saadat Hasan Manto (1912-1955) Men of Letters. Pakistan Postal Services.