संवेदक
Appearance
संवेदक (जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगीज, इंग्लिश:Sensor) म्हणजे एक बदल जाणण्याची क्षमता असलेले साधन. हे साधन प्रत्यक्षातील गोष्टी मोजते आणि त्याचे वाचन करता येईल अशा संदेशात रूपांतर करते. हे संवेदक पारंपरिक मापन यंत्रांची जागा घेत आहेत. उदाहरणार्थ, पाऱ्याच्या उष्णतेच्या कमी अधिक होण्याने प्रसरण आणि आकुंचन होण्याच्या गुणधर्मावर आधारित [[तापमापी]च्या ऐवजी आता तापमानानुसार विद्युत्विरोध बदलणारी थर्मिस्टर नावाची वस्तू वापरून तापमापीचा संवेदक बनतो. याला रेडियो सर्किट जोडून दूरवरून तापमान वाचता येते.
बाजारात विविध प्रकारचे संवेदक भरपूर प्रमाणात मिळतात. त्यांचा वापर रोजच्या वापरातील अनेक उपकरणात केला जातो.
जैव संवेदक
[संपादन]डोळे, कान, त्वचा हे जैव संवेदक आहेत.
यांत्रिक संवेदकांचे प्रकार
[संपादन]- औष्णिक संवेदक
- विद्युत्चुंबकीय संवेदक
- विद्युत प्रतिकारक संवेदक
- विद्युत्चालक संवेदक
- दाब संवेदक
- हालचाल संवेदक
- गति संवेदक
- प्रकाश संवेदक
- चित्र संवेदक
- शब्द संवेदक
- चित्रवाणी संवेदक