श्वेत समुद्र
Appearance
श्वेत समुद्र (नॉर्वेजियन: Barentshavet, रशियन: Баренцево море) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. बारेंट्स समुद्राच्या दक्षिणेस असलेला व ९०,००० चौरस किमी पसरलेला श्वेत समुद्र संपूर्णपणे रशिया देशाच्या सरहद्दीत आहे व रशियाचा अंतर्गत भाग मानला जातो. प्रशासकीय दृष्ट्या हा समुद्र रशियाच्या अर्खांगेल्स्क ओब्लास्त, मुर्मान्स्क ओब्लास्त व कॅरेलिया प्रजासत्ताक ह्या विभागांदरम्यान वाटला गेला आहे. अर्खांगेल्स्क हे रशियाचे मोठे बंदर ह्याच समुद्रावर स्थित आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- माहिती Archived 2009-08-13 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |