श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[१]


श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना,सोमेश्वरनगर

      पुणे जिह्यातील बारामती शहाराच्या पूर्वेला ३९ किमी सहकारी तत्त्वावर चालविला जाणारा एक महत्त्वाचा साखर कारखाना म्हणजे "श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना".

      या कारखान्यामध्ये तीन विभाग आहेत-मुख्य साखर कारखाना,वीजनिर्मिती प्रकल्प आणि इथनॉल निर्मिती प्रकल्प.

साखर कारखान्यामध्ये सोमेश्वर ,वानेवाडी ,मुरूम ,वाघळवाडी, निंबुत,निरा,वडगाव निंबाळकर, सुपे, मांडकी ई.

गावामधून ऊस येतो.साधारणतः ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्यामध्ये ऊसाचे गाळप केले जाते.

ऊसापासून मिळणाऱ्या मळीपासून किण्वन प्रक्रियेतून इथेनॉल तयार केले जाते.तयार झालेले इथेनॉलचे शुद्धीकरण

करून त्याची निर्यात केली जाते.

बगॅस हे ऊसापासून तयार होणारा दुय्यम उत्पादन आहे .बगॅस वर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाते.तयार झालेल्या वीजेपासून कारखान्याची , इथेनॉल प्रकल्पाची गरज भागवली जाते व उरलेली वीज सातारा जिल्ह्याला विकली जाते.

ऊसाच्या गळपाबरोबर इतर प्रकल्पामुळे ऊसाला चांगला दर भेटतो.त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे जनजीवन सुधारले आहे.