Jump to content

श्रीजया अशोकराव चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲड. श्रीजया अशोक चव्हाण आमदार

विधानसभा सदस्य
भोकर क्षेत्र साठी
विद्यमान
पदग्रहण
नोव्हेंबर २०२४
मागील अशोकराव चव्हाण
बहुमत महायुती

जन्म १९९२
नांदेड, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
मागील इतर राजकीय पक्ष युवती काँग्रेस
आई सौ. अमिताताई चव्हाण
वडील अशोकराव
नाते शंकरराव चव्हाण
शिक्षण बी.एस्सी,एल.एल.बी
गुरुकुल विधी महाविद्यालय, मुंबई
व्यवसाय विधीज्ञ
धंदा उद्योजक
धर्म हिंदू

ॲड.श्रीजया चव्हाण या मराठी राजकारणी आहेत. २०२४ च्या निवडणुकांमध्ये या भोकर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांचे आजोबा व वडील हे दोघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

त्यांच्या आई व त्या स्वतः भोकर या एकाच विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आई-मुलगी आमदार बनण्याचा विक्रम केला आहे. आई श्रीमती अमिता अशोकराव चव्हाण याच भोकर विधानसभा मतदारसंघच्या सदस्या होत्या. श्रीजया व सुजया या जुळ्या अपत्यांपैकी ॲड. श्रीजया ज्येष्ठ कन्या आहे.