Jump to content

श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किसन सारडा
जन्म श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा
१८९३
सोलापूर, महाराष्ट्र
मृत्यू १८९३ - १२ जानेवारी १९३१
मृत्यूचे कारण फाशी
राष्ट्रीयत्व भारतीय
ख्याती स्वातंत्रसैनिक
धर्म हिंदू


श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा (१८९३ - १२ जानेवारी १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक होते. त्यांना किसन सारडा म्हणून ओळखले जाते. ते महाराष्ट्रातील सोलापूरचे होते.[] श्रीकिसन सारडा हे सोलापुरातील पिढीजात सधन व्यापारी होते. सुमारे १८३०-१८३५ च्या सुमारास त्याचे आजोबा गोविंदराम सारडा सोलापूरला आले होते आणि ते कायम निनिवासी झाले. श्री लक्समिनारायण यांनी सोलापुरात व्यापार वाढविला. ते बँकर म्हणून ओलकले जात. नर्सिंग गिरजी मिलचे त्यांनी शेअर खपविले त्यासाठी त्यांना श्री वारदाकडून कमिशन मिळत असे. ते सामाजिक कार्य करीत, सोलापूर नगरपालिकेचे सभासाद या नात्यानें १८९६ च्या दुष्काळात कमी भावाने धान्य विकले. श्रीकिसन यांनी वडिलांचे वारसा उत्तम चालवले. ते काही काळ लक्ष्मी विष्णू मिलचे ब्रोकर होते. वडिलाप्रमाणंच ते धर्मदाया खर्च करीत. हिंदू धर्मचे अभिमान होते. धार्मिक कार्यक्रमांना सढळ मदत करीत. ते हिंदू धर्मचे पुढारी समजले जात. मलप्पा धनशेट्टी हे त्यांचे मित्र होत, म्हणून ते चळवळीशी जोडले गेले. हिंदू समाजाचे पुढारीपण मार्शल लॉच्या सापळ्यात अडकली. १३ मे रोजी अटक झाली. सारडा यांनी आपले मत कोर्टला सांगून सुद्धा कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा दिली. ते समाजसेवक होते. हिंदू धर्माबद्दल त्यांना खूप प्रेम आणि अभिमान होते. सोलापूरातील ते हुतात्मा म्हणून उदयास आले. त्याचे सामाजिक काम निस्वार्थी होते. किसान सारडा फासावर जाईपर्यंत देशाचे इमान राखून आपल्या देहाचे सार्थक केले.

स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1930 मध्ये सोलापूरमध्ये मार्शल लॉ अंतर्गत "दिसल्याबरोबर गोळी मारण्याचा" आदेश लागू केला होता. मल्लप्पा धनशेट्टी, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ भगवान शिंदे यांच्यासह श्रीकिसन सारडा यांनी लष्करी कायद्याचे उल्लंघन केले. स्वातंत्र्य चळवळ शमवण्यासाठी सरकारने चौघांना फाशीची शिक्षा सुनावली.[]हा दिवस सोलापुरात 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "History | District Solapur, Govt. of Maharashtra, India | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-15 रोजी पाहिले.
  2. ^ "4 दिवसांचं स्वातंत्र्य, 4 हुतात्म्यांना फाशी, सोलापूरच्या 'मार्शल लॉ'चा हा इतिहास माहिती आहे का?". BBC News मराठी. 2022-01-12. 2022-01-15 रोजी पाहिले.