श्रीकांत जिचकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्रीकांत जिचकार (१४ सप्टेंबर, इ.स. १९५४ - २ जून, इ.स. २००४) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते[१]. अल्पावधीमध्ये मिळवलेल्या बहुआयामी यशामुळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते.

सुरुवातीचे शिक्षण[संपादन]

जिचकारांनी आपल्या शिक्षणाची सुरवात ही एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमापासून केली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यासक्रम घेऊन एल.एल.एम. पदवी घेतली. त्यांनी इ.स. १९९० पर्यंत एकूण ४२ विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या व यातील २८ परीक्षांमध्ये सुवर्णपदक, इतर परीक्षांमध्ये प्रथम वर्ग मिळवला. त्यांचे नाव हे भारतामधील सर्वांत जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून घेतले जाते[ संदर्भ हवा ]. यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह होता.

जिचकारांच्या पदव्या[संपादन]

जिचकारांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे. जिचकरांनी १० विषयांत एम ए केले. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉफी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व व मानसशास्त्र यांचा समावेश आहे. जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवी मिळवली. ते आय.पी.एस. (इंडियन पोलीस सर्व्हिस-उत्तीर्ण) होते आणि आय.ए.एस.(इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस-उत्तीर्ण)ही होते. जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द[संपादन]

सामाजिक[संपादन]

त्यांनी इ.स. १९७८ मध्ये भारतीय पोलीस सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली व इ.स. १९८० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले. ४ महिन्यामध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी या सेवेचा राजीनामा दिला. ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते.

श्रीकांत जिचकार पत्रकार होते आणि कीर्तनकारही होते. ते वकील होते, पोलीस होते आणि डॉक्टरही होते.

राजकीय[संपादन]

जिचकार महाराष्ट्र विधानसभेमध्ये इ.स. १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण सभासद होते[ संदर्भ हवा ]. त्यांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता[ संदर्भ हवा ]. इ.स. १९९२ साली त्यांची भारताच्या राज्यसभेवर निवड झाली. ते इ.स. १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो व युनिस्को संघटनांसाठी ही काम केले.

निधन[संपादन]

जिचकारांचा २ जून, इ.स. २००४ रोजी नागपुराजवळ कोढली गावानजीक घडलेल्या कार-अपघातामध्ये मृत्यू झाला. याप्रकऱणी २ नोव्हेंबर २०१३ रोजी कोर्टाने जिचकारांच्या कार-ड्रायव्हरसह एसटी महामंडळालाही जबाबदार धरले आणि जिचकार यांच्या कुटुंबीयांना ५० लाख ६७ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "श्रीकांत जिचकार किल्ड इन अ‍ॅन अ‍ॅक्सिडेंट (श्रीकांत जिचकार एका अपघातात मृत)" (इंग्लिश भाषेत). ३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)


बाह्य दुवे[संपादन]