Jump to content

जगन्नाथ दीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Dr. Jagannath Dixit

डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे महाराष्ट्रातील एक डॉक्टर, मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक आणि संशोधक आहेत. डॉ. दीक्षित हे त्यांच्या 'फक्त दोन वेळा दिवसातून जेवा आणि वजन कमी करा' या डाएट प्लॅनसाठी प्रसिद्ध आहेत.[][][][][][][][][]

जीवनशैली

[संपादन]

हा डॉ. श्रीकांत जिचकारांनी सांगितलेला डाएट प्लॅन आहे असे ते सांगतात. खाण्याच्या प्रमाणावर आणि खायच्या पदार्थांवर कुठलेही बंधन या डाएट प्लॅन मध्ये नाही. परंतु खाण्याच्या वारंवारतेवर मात्र बंधन आहे आणि ते दिवसातून फक्त दोनवेळा खाण्यास सांगतात. लठ्ठपणा आणि मधुमेह याचा प्रतिबंध आणि काही प्रमाणात उपचार तसेच लठ्ठपणा आणि मधुमेह काही लोकांमध्ये या डाएट प्लॅन ने परतवून लावता येतो असा दावा ते करतात. [१०]

कार्बो इन्सुलिन कनेक्शन

[संपादन]

सतत थोडे थोडे खाण्यामुळे शरीरात सतत इन्सुलिन निर्माण होत राहाते. हे वाढलेले इन्सुलिन ग्लुकॅगॉनला येऊ देत नाही. ग्लुकॅगॉन हे शरीरातील मेद जाळणारे नैसर्गिक हार्मोन आहे. त्यामुळे सतत थोडे थोडे खाण्यामुळे ग्लुकॅगॉनला काम न करता आल्यामुळे चरबीचे रूपांतर ऊर्जेत होत नाही आणि शरीरात चरबी तशीच साठून राहते. ही वाढलेली चरबी लठ्ठपणा निर्माण करते. हा लठ्ठपणा काही व्यक्तींमध्ये मधुमेह निर्माण करतो. लठ्ठपणा इन्सुलिन रेझिस्टन्स (प्रतिरोध) निर्माण करतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्सच्या अवस्थेस टाईप टू डायबेटीस किंवा मधुमेह असे म्हणतात.

एक जेवण ५५ मिनिटात पूर्ण करावे असे या डाएट प्लॅन मध्ये सांगण्यात आले आहे. ५५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ जेवण केल्यास शरीरात अधिक इन्सुलिन तयार होते असे डॉ. दीक्षितांचे म्हणणे आहे.(<< please clarify properly?) थोडे-थोडे अन्न खाल्ले तरीदेखील पुन्हा इन्सुलिन तयार होते आणि कमी किंवा अधिक खाल्ल्यास तेवढेच इन्सुलिन निर्माण होते असे डॉ. दीक्षित सांगतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कमी प्रमाणात अन्न खाण्यापेक्षा अन्न खाण्याची वारंवारता कमी करावी (दोन वेळा) असा सल्ला ते देतात.

आता डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी लहानग्यांसाठी फीट राहण्याचा मूलमंत्र आणला आहे.. तुमची मूलं खूप जंक फूड खात असतील, किंवा अगदीच काहीही पौष्टिक खाण्यासाठी टाळाटाळ करत असतील, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. आणि त्यामुळे सध्या सुट्ट्यांमध्ये आणि पुढेही तुमचं मूल फिट आणि हेल्थी राहाण्यासाठी ही चर्चा नक्की बघा. कारण डॉ.जगन्नाथ दिक्षित स्वत आपल्यासोबत आहेत.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेक जण कोल्ड्रिंक्स पिण्याला अधिक पसंती देत असतात. मात्र हेच कोल्ड्रिंक्स आरोग्याला घातक आहे. त्यामुळे कोणीही कोल्ड्रिंक्स अजिबात पिऊ नका, असा सल्ला जगन्नाथ दीक्षित यांनी नाशिकमध्ये दिला.

युट्यूबवरील व्याख्यानांच्या लिंक्स

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'Two-meals-a-day' professor to drive diabetes fight - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2018-12-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Maharashtra Picks 'Two-Meals-A-Day' Doctor to Lead War on Obesity & Diabetes!". The Better India (इंग्रजी भाषेत). 2018-11-21. 2018-12-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Dr Jagannath Dixit–Pioneer Of 'Two-Meals-A-Day' Diet Plan, To Steer Diabetes, Obesity Fight In Maharashtra". swarajyamag.com. 2018-12-09 रोजी पाहिले.
  4. ^ India, Press Trust of (2018-11-20). "Dr Dixit appointed ambassador of Maha's anti-obesity campaign". Business Standard India. 2018-12-09 रोजी पाहिले.
  5. ^ "डॉ. जगन्नाथ दीक्षित ब्रॅंड ॲम्बेसेडर". Maharashtra Times. 2018-11-20. 2018-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-09 रोजी पाहिले.
  6. ^ author/lokmat-news-network (2018-11-25). "'खा!', पण त्यातलं शास्त्र समजून, सांगताहेत डॉ. जगन्नाथ दीक्षित". Lokmat. 2018-12-09 रोजी पाहिले.
  7. ^ "'Two full meals a day can help lose weight' - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2018-12-09 रोजी पाहिले.
  8. ^ "Ideal diet plan for weight loss can prevent diabetes: Doctor - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2018-12-09 रोजी पाहिले.
  9. ^ Indurkar, Sanjiv; Dixit, Jagannath V. (2017-10-26). "Effect of eating frequency on prediabetes status: a self-controlled preventive trial". International Journal of Clinical Trials (इंग्रजी भाषेत). 4 (4): 171–175. doi:10.18203/2349-3259.ijct20174118. ISSN 2349-3259.
  10. ^ By लोकमत न्यूझ नेटवर्क | Published: November 25, 2018 06:03 AM | Updated: November 25, 2018 06:05 AM ‘खा!’, पण त्यातलं शास्त्र समजून, सांगताहेत डॉ. जगन्नाथ दीक्षित(Accessed on 14 December 2018)