Jump to content

शौर्य क्षेपणास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शौर्य हे क्षेपणास्त्र बंदिस्त आवरणातून सोडण्यात येणारे भारतीय क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला ७५० ते १९०० किलोमीटरपर्यंतचा आहे.[] अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी प्रामुख्याने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.

स्वरूप

[संपादन]

बंदिस्त आवरणातून सोडण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रात हे आवरण भेदून लक्ष्यावर जाण्याची क्षमता असावी लागते. पाणबुडीच्या आवरणातूनही हे क्षेपणास्त्र सोडता आले की अशा क्षेपणास्त्राची जागा हेरणे शत्रूला अवघड जाते. हे क्षेपणास्त्र आवरणात असल्यामुळे ते शत्रूच्या उपग्रहांच्या नजरेस न पडता कोठेही वाहून नेता येते व हव्या त्या ठिकाणाहून डागता येते.

प्रगती

[संपादन]

यापुढच्या टप्प्यात ते पाणबुडीतून सोडण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

अधिक माहिती

[संपादन]

प्राथमिक अवस्थेत असून अजून चाचण्या बाकी आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ अरुण विश्वकर्मा. "Shourya/Sagarika Missile" (PDF) (इंग्लिश भाषेत). २०१३-०९-०३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्यदुवे

[संपादन]