Jump to content

शेड्युल्ड बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनुसूचित बँक तथा शेड्युल्ड बँक ही रिझर्व्ह बँक कायदा , १९३४च्या अन्वये असणाऱ्या दुसऱ्या अनुसूचित समाविष्ट असणारी बँक होय,

अनुसूचित बँकेला आपल्या व्यवहारांची माहिती रिझर्व्ह बँकेला दर आठवड्याला द्यावी लागते. ठेवीदारांच्या संरक्षणासाठी रिझर्व्ह बँक अनुसूचित बँकावर कडक लक्ष ठेवून असते.

उदा.

  1. कॉसमॉस बँक, पुणे
  2. जनता सहकारी बँक, पुणे

अनुसूचित आणि विना-अनुसूचित बँकेतील फरक[संपादन]

अनुसूचित बँक विना-अनुसूचित बँक
या बँकाचे भाग भांडवल २५ लाख रुपयांपेक्षा जास्ती असते या बँक रिझर्व्ह बँकेच्या नियमात नसल्याने अनुसूची २ मध्ये समाविष्ट नसतात.
रोख तरतूद गुणोत्तर रिझर्व्ह बँकेत सांभाळले जाते रोख तरतूद गुणोत्तर स्वतःच सांभाळतात
काही बँकिंग विषयक गरजांसाठी रिझर्व्ह बँकेकडून उधार पैसे घेण्याची सोय असते विना-अनुसूचित बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे उधार घेऊ शकत नाहीत
रिझर्व्ह बँकेला ठराविक काळाने माहिती देण्याचे बंधन अनुसूचित बँकावर असते असे कुठलेही बंधन नसते. त्यामुळे विश्वासार्हता कमी.
समाशोधन गृहाचे सदस्य बनता येते समाशोधन गृहाचे सदस्य बनता येत नाही