Jump to content

शीतल आमटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शीतल आमटे-करजगी
जन्म १९८१
वरोरा, महाराष्ट्र
मृत्यू ३० नोव्हेंबर २०२०
चंद्रपूर, महाराष्ट्र
मृत्यूचे कारण आत्महत्या
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
पेशा चिकित्सक, सामाजिक कार्यकर्ता, अपंगत्व विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ
प्रसिद्ध कामे महारोगी सेवा समिती, वरोरा येथे कार्यकारी अधिकारी
जोडीदार गौतम करजगी
अपत्ये शर्विल करजगी
वडील विकास आमटे
आई भारती आमटे
संकेतस्थळ
www.sheetalamtekarajgi.com

शीतल आमटे (१९८१ - ३० नोव्हेंबर २०२०), लग्नानंतरचे नाव शीतल करजगी, एक भारतीय सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, अपंगत्व विशेषज्ञ आणि सामाजिक उद्योजक होत्या. शीतल आमटे महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्य होत्या. या संस्थेत प्रामुख्याने कुष्ठरोगापासून वंचित असलेल्यांना मदत करण्याचे काम करतात.[१][२]

आयुष्य[संपादन]

शीतल आमटे ही विकास आमटे आणि भारती आमटे यांची कन्या आणि बाबा आमटे यांची नात होती, ज्यांनी महाराष्ट्र राज्यात आनंदवन येथे कुष्ठरोग्यांसाठी पुनर्वसन गृह स्थापन केले.[३][४] यांनी ही सेवा चालविण्यासाठी महारोगी सेवा समितीची स्थापना केली, ज्यात आरोग्य सेवा, पुनर्वसन, शिक्षण, शेती आणि आर्थिक सबलीकरण कार्यक्रमांचा समावेश आहे.[५][६]

त्यांनी वैद्यकीय अभ्यास केला आणि डॉक्टर बनली आणि आजोबांचे स्वप्न कायम ठेवण्यासाठी आनंदवनात काम करणाऱ्या कुटूंबात सामील झाल्या; त्यांचा भाऊ कौस्तुभ आनंदवानसाठी अकाउंटंट आहे आणि तिचे काका प्रकाश आमटे आणि काकू मंदाकिनी आमटे देखील या समाजातील डॉक्टर आहेत.[२][७]

आनंदवनच्या शाळांमधील मुलांना भोजन उपलब्ध करून देण्यासाठी त्या टेक महिंद्रा फाउंडेशनची आर्थिक मदत घेण्यास यशस्वी झाल्या.[८] त्यांनीसंस्थेत सौर उर्जा पॅनेल बसविण्याचे नेतृत्व केले, परिणामी महारोगी सेवा समितीला असोसिएशन ऑफ एनर्जी इंजिनिअर्स कडून २०१६ सालच्या इनोव्हेटिव्ह एनर्जी प्रोजेक्टचा पुरस्कार मिळाला आणि भविष्यात अधिक स्मार्ट तंत्रज्ञानाचा संस्थेत समावेश करण्याच्या उद्देश ठेवले.[९]

२०१६ मध्ये तिला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने यंग ग्लोबल लीडर म्हणून नेमले.[१] संयुक्त राष्ट्र इनोव्हेशन अ‍ॅम्बेसेडर आणि आय4पी (इनोव्हेशन फॉर पीस, अर्थात शांतते साठी नऊपक्रम)च्या सल्लागार म्हणूनही त्यांची निवड झाली.[३] [१०]

३० नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली.[११][१२] त्यांनी आपल्यामागे आईवडील, नवरा आणि सहा वर्षाचा मुलगा शर्विल करजगी यांना सोडले.

संदर्भ[संपादन]

 1. ^ a b "Four Indians figure in WEF's Young Global Leaders Class of 2016". The Economic Times. 16 March 2016. 29 May 2018 रोजी पाहिले.
 2. ^ a b "A New Generation Takes Up Baba Amte's Torch – OpEd". Eurasia Review (इंग्रजी भाषेत). 26 May 2018. 29 May 2018 रोजी पाहिले.
 3. ^ a b "Parmesh's Viewfinder: Meet the Amtes". Verve Magazine (इंग्रजी भाषेत). 3 June 2016. 29 May 2018 रोजी पाहिले.
 4. ^ Pandya, Haresh (17 February 2008). "Baba Amte, 93, Dies; Advocate for Lepers". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. 29 May 2018 रोजी पाहिले.
 5. ^ Palmer, Joanna; Mullan, Zoë (December 2016). "Highlights 2016: moving pictures". The Lancet (English भाषेत). 388 (10063): 2975–2988. doi:10.1016/S0140-6736(16)32532-6. ISSN 0140-6736.CS1 maint: unrecognized language (link)
 6. ^ "Dr. Sheetal Amte, Baba Amte's daughter shares her story today". sheroes.com. Archived from the original on 2019-09-05. 29 May 2018 रोजी पाहिले.
 7. ^ Indian public health expert,Dr Sheetal Amte reportedly dies Archived 2020-12-12 at the Wayback Machine.
 8. ^ Khanna, Vinod (2015). Making Dreams Come True: The Story of the Tech Mahindra Foundation. Penguin.
 9. ^ "International award for Anandwan's solar energy use – Times of India". The Times of India. 29 May 2018 रोजी पाहिले.
 10. ^ "Stories, Ideas and Perspectives | 300+ Inspirational talks by remarkable people from INK events -". www.inktalks.com. 26 August 2016 रोजी पाहिले.
 11. ^ "BBC News मराठी".
 12. ^ MumbaiNovember 30, Sahil Joshi; November 30, 2020UPDATED:; Ist, 2020 18:07. "Baba Amte's granddaughter Sheetal Amte dies by suicide, weeks after public spat over family trust". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)