शिवजयंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिव-जयंती या पानावरून पुनर्निर्देशित)
शिवजयंती
Shivaji British Museum.jpg
अधिकृत नाव छत्रपती शिवाजी महाराज जयंती
इतर नावे शिवजयंती, शिवाजी जयंती
साजरा करणारे महाराष्ट्रातील हिंदू, बौद्ध
प्रकार सामाजिक
उत्सव साजरा १ दिवस
दिनांक १९ फेब्रुवारी
वारंवारता वार्षिक

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.[१] महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.

महाराष्ट्रात काही लोक तिथीप्रमाणे हा दिवस साजरा करतात.

इतिहास[संपादन]

इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदिर्घ असा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य घराघरात पोहचावे यासाठी फुले यांनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरु केली. ही पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेंव्हा पासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. पुढे २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखिल शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

उद्देश[संपादन]

शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे उदात्त विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]