शिवाजी महाराजांची सैन्य रचना
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
शिवाजी महाराजांची सैन्य रचना साधारणपणे खालील प्रकारची होती.
पायदळ
[संपादन]- ९ शिपायांवर (पावलोक) -१ नाईक
- १० नाईकांवर - १ हवालदार
- ३ हवालदारांवर - १ जुमलेदार
- १० जुमलेदारांवर - १ हजारी मनसबदार
- ७ एक हजारी मनसबदारांवर - सप्त हजारी मनसबदार
वरील सर्वांचा अधिकारी- सरनोबत/सरसेनापती
घोडदळ
[संपादन]यात दोन प्रकार असत. एक 'बारगीर' आणि 'शिलेदार'. बारगीर म्हणजे सरकारी घोडेस्वार.यास सर्व सामान शिवाजी महाराजांतर्फे दिल्या जायचे शिलेदार म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचा घोडा व आवश्यक सामान आहे तो. त्यात तैनाती फौज व राखीव फौज असे दोन प्रकार होते.तैनाती फौजेत बारगीर तर राखीव फौजेत शिलेदार असत.घोड्यांची निगा राखणारे-मोतद्दार. दर २ माणसांमागे तीन घोडे ठेवल्या जात होते.
- २५ घोडेस्वारांवर - १ नियंत्रक (हवालदार)
- ५ हवालदारांवर - १ जमादार
- १० जमादारांवर - १ अधिकारी (एक हजारी मनसबदार)
- ५ एक हजारी मनसबदारांवर - १ पंच हजारी मनसबदार
- सर्व पंच हजारी मनसबदारांचा अधिकारी - १ सरनोबत(सर्वोच्च अधिकारी)