शिवाजी महाराजांची राजमुद्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
शिवाजी महाराजांची मुद्रा आणि मर्यादा

शिवाजी महाराजांची मुद्रा[संपादन]

छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांना शहाजीराजांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे -

 • संस्कृत :
  "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
  शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
 • अन्वय :

प्रतिपत् चंद्र लेख इव वर्धिष्णुः विश्ववन्दिता
शाहसूनः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते

 • मराठी अर्थ :
 1. प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.
 1. प्रतीपदेच्या चंद्रा प्रमाणे वाढत जाणारी व विश्वात सर्वानी वंदलेली शहाजी पुत्र शिवाजी यांची ही मुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी विलसत आहे.
 1. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.
 2. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंदनीय असणारी, शहाजी राजेंचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते.
 • Romanization :

"Pratipchandralekhev Vardhishnurvishwavandita Shahasuno Shivsyaesha Mudra Bhadray Rajate"

 • इंग्रजी :

ever-increasing like the crescent-moon, the kingdom of Shivaji, son of Shahaji, will always seek the welfare of the people.[१]

मर्यादा[संपादन]

मर्यादा मुद्रेवरचा मजकूर होता, मर्यादेय विराजते. याचा अर्थ इथे लेखनाची मर्यादा म्हणजे शेवट झाला. यासोबतच पत्राच्या मध्यभागी ही प्रधान मुद्रा उमटवली जायची.

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Chatrapati Shivaji Maharaj Memorial".