शिरवणे
Appearance
शिरवणे हे महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातले एक गाव आहे. गावाच्या उत्तरेस उर्फी, पूर्वेस फणसू, पश्चिमेस पन्हालेकाजी ही गावे असून दक्षिणेस खाडीच्या किनारी दाभोळ बंदर वसले आहे. गावाजवळून कोटजाई नदी वाहते. गावाजवळील परिसरात पन्हालेकाजी गावापाशी असलेली प्राचीन लेणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. शिरवण्याचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या कालेश्रीचे मंदिर गावाजवळील टेकडीवर आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.