Jump to content

शिरदाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?शिरदाळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
४७९.७८ चौ. किमी
• ८४० मी
जवळचे शहर मंचर
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 410508
• एमएच/14

शिरदाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. आंबेगाव तालुक्यातील मिनी महाबळेश्वर या गावाला म्हणले जाते. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि पशुपालन हा आहे.

शेती = प्रामुख्याने येथे बटाटा, ज्वारी, बाजरी, वाटाणा, हरबरा, मूग, भुईमूग इत्यादी पिके घेतली जातात. बटाटा पिकाचे आगार या गावाला म्हणले जाते.

भौगोलिक स्थान

[संपादन]

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पूर्व सीमेवर शिरदाळे हे गाव आहे. पुणे शहरापासून 75 किमी अंतरावर आहे. गावापासून तालुक्याचे ठिकाण 37 किमी आहे. राजगुरुनगर शहरापासून पूर्वेला 18 किमी आहे.

सह्याद्री मधील भीमाशंकर मुख्य पर्वतरांगेची उपशाखा असलेली सातगाव पठार ह्या रांगेच्या शेवटच्या टोकाला हे गाव आहे. समुद्रसपाटीपासून 840 मीटर उंच वसलेल आहे.

हवामान

[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

शिरदाळे गावात 5 ते 6 मंदिरे आहेत.

1) ग्रामदैवत हनुमान मंदिर :- गावातील मुख्य गावठाणामध्ये 51 फुट उंच हनुमानाचे मंदिर आहे. मंदिर 16 व्या शतकातील असून मंदिराची स्थापना रामदास स्वामींनी केली आहे असे सांगण्यात येते. जुन्या काळी मंदिर कौलारू होते. 2006 मध्ये ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात संगमरवरी मारुतीची, विठ्ठल रुक्मिणी आणि गणपतीची मूर्ति आहे. मंदिर भव्य दिव्य आहे. मंदिराच्या समोर भव्य पटांगण देखील आहे.

2) म्हाळसाकांत सागदरा देवस्थान :- म्हाळसाकांत खंडोबाचे प्रकटस्थान असलेल हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य आहे. 12 व्या शतकात या गावातील भक्त तांबे बाबा यांच्या स्वप्नात साक्षात्कार झाला आणि खंडोबा या सागदरा या ठिकाणी एका सागवानाच्या झाडात प्रकट झाला. आज देखील ते सागाचे जंगल अस्तित्वात आहे. या ठिकाणी खंडोबाची पाउले देखील आहेत. येथे जाण्यासाठी अलीकडच्या काळात पायऱ्या देखील करण्यात आल्या आहेत.

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

1) पोस्ट : धामणी-4 कि.मी 2) राजगुरुनगर-18 कि.मी 3) तालुक्याच ठिकाण: घोडेगाव-37 कि.मी

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate