शिंगॉन बौद्ध धर्म
Jump to navigation
Jump to search
शिंगॉन (जपानी: 真言宗) हा एक जपानी बौद्ध संप्रदाय आहे. हे जपानी बौद्ध धर्माच्या मुख्य प्रवाहातील प्रमुख प्रणालींपैकी एक आहे. वज्रबोधी व अमोघवज्र यांसारख्या भटकत्या साधूंनी भारतातून चीनमध्ये नेलेल्या आणि तिसऱ्या-चौथ्या शतकापासून सुरू झालेल्या गुप्त बौद्धमतांपैकी शिंगॉन एक आहे. कूकै या बौद्ध भिक्खूच्या मार्गदर्शनाखाली नंतर जपानमध्ये या मताचा उत्कर्ष झाला. गोपनीय शिकवणीच्या प्रसारास परवानगी मागण्यासाठी कूकै तंग राजवटीच्या काळात चीनमध्ये गेला होता. त्याच्यामुळे या मताला जपानी गुप्त बौद्धमत किंवा पारंपरिक गुप्त बौद्धमत असेही म्हटले जाते. झेन्यान या चिनी शब्दावर बेतलेल्या शिंगॉन या संज्ञेचा अर्थ सत्य शब्द असा होतो. झेन्यान हा शब्द मंत्र या संस्कृत शब्दावर बेतलेला आहे.[ संदर्भ हवा ]