Jump to content

शशिकला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शशिकला
शशिकला
जन्म शशिकला जवळकर
४ ऑगस्ट १९३२
सोलापूर, महाराष्ट्र
मृत्यू ४ एप्रिल २०२१
मुंबई
नागरिकत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
कारकिर्दीचा काळ १९४४-२००६
मूळ गाव सोलापूर
ख्याती
  • आरती
  • गुमराह
  • सोनपरी मालिका
जोडीदार ओम प्रकाश सैगल
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार

शशिकला जवळकर-सैगल ( 4 ऑगस्ट 1932 - 4 एप्रिल 2021), शशिकला नावाने ओळखल्या जाणाऱ्या, एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री होत्या. त्यांनी 1940च्या दशकापासून शेकडो बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या.

जवळकर कुटुंब मुंबईला येऊन काम शोधत होते. त्यावेळच्या लोकप्रिय गायिका नूरजहान यांना भेटून शशिकला यांनी काम मागितले. आणि नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकला यांना संधी मिळाली. नंतर व्ही. शांताराम यांच्या तीन बत्ती चार रास्तामध्ये बहुभाषक भावजयींपैकी मराठी भावजयीच्या भूमिका त्यांनी केली. १९५३ सालच्या या चित्रपटानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका मिळू लागल्या. याप्रकारच्या खलभूमिका त्यांनी आरती (१९६२), गुमराह (१९६३) आणि फूल और पत्थर (१९६६) चित्रपटांतून केल्या.

कुटुंब

[संपादन]

शशिकला आपल्या जवळकर कुटुंबातल्या सहा मुलांपैकी सर्वात धाकट्या होत्या. त्यांच्या पतीचे नाव ओम प्रकाश सैगल.

समाजसेवा

[संपादन]

शशिकलाबाईंनी १९८० च्या दशकात, मदर तेरेसांच्या ओढीने मिशनरीज ऑफ चॅरिटीजमध्ये घर सोडून सेवा केली. कुष्ठरुग्णांची सेवा, फरश्या पुसणे अशी कोणतीही कामे त्या तेथे करीत होत्या.

चित्रपट

[संपादन]
  • अनोखा बंधन
  • अमानत
  • अर्जुन
  • आरती (१९६२ - मीनाकुमारीची भावजय 'जसवंती'ची भूमिका)
  • आहिस्ता आहिस्ता
  • कभी खुशी कभी गम
  • क्रांति
  • खुबसूरत
  • गुमराह (१९६३ - माला सिन्हाला ब्लॅकमेल करणारी 'मिस रॉबर्ट ऊर्फ लीला'ची खलनायकी भूमिका)
  • घर घर की कहानी
  • चोरी चोरी
  • जंगली
  • ज्योती
  • झंकार बीट्स
  • ढूँढते रह जाओगे
  • तवायफ
  • तीन बत्ती चार रास्ता ( १९५३ - मराठी भावजयीची भूमिका)
  • तेरी माँग सितारों से भर दूँ
  • दादागिरी
  • दुल्हन वोही जो पिया मन भायें
  • नीला आकाश
  • पद्मश्री लालू प्रसाद यादव
  • फिर वोही रात
  • फूल और पत्थर (१९६६)
  • बादशाह
  • बिवी ओ बिवी
  • महानंदा ( प्रेमापेक्षा व्यवहारच पाहणाऱ्या भावीण आईची भूमिका)
  • मुझसे शादी करोगी
  • मेरा करम मेरा धरम
  • मैं तेरे लिये
  • यह कैसा इन्साफ?
  • यह तो कमाल हो गया
  • रक्त
  • राॅकी
  • राम तेरा देश
  • लहू के दो रंग
  • सम्राट
  • सरगम
  • सलमा पे दिल आ गया
  • साजन मेरे मैं साजन की
  • सुजाता (अल्लड धनिक मुलीची भूमिका)
  • सौतन
  • स्वयंवर
  • स्वामी
  • हमारा संसार

पुरस्कार

[संपादन]
  • आरती आणि गुमराह या चित्रपटांमधील भूमिकांसाठी 'फिल्मफेर' पुरस्कार
  • केंद्र सरकारकडून पद्मश्री (इ.स. २००७)
  • 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'कडून जीवनगौरव पुरस्कार (२०१४)
  • महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे 'राज कपूर कारकीर्द-गौरव पुरस्कार(२०१५)