शंकराचार्यांचा मठ (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

पुण्यातल्या नारायण पेठेतील मुंजाबाच्या बोळात शंकराचार्यांचा मठ आहे. केवळ य मठात आदि शंकरार्यांची मूर्ती आहे, म्हणून हा शंकराचार्यांचा मठ म्हणून ओळ्खला जातो. मूर्ती संगमरवरी असून एका छोट्या देवळात तिची स्थापना केलेली आहे. मूर्तीसमोर वैशिष्ट्यपूर्ण बाण (उभा दंडगोल) असलेले एक शिवलिंग आहे. समोर एक संगमरवरी नंदी आहे.

पुण्यातल्या या शंकराचार्यांच्या मठाची स्थापना परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांचे शिष्य शिरोळकर स्वामींनी केली. टेंबेस्वामींनी उत्तरेतील ब्रह्मावर्त अर्थात बिठूर येथे चातुर्मास केला तेव्हा त्यांना शिरोळकर भेटले. स्वामींनी शिरोळकरांना संन्यास घ्यायला लावला. त्यानंतर शिरोळकर पुण्यास आले आणि त्यांनी सन १९७९ या वर्षातील ज्येष्ठ महिन्यात या मठाची स्थापन केली. शिरोळकर स्वामी हे संकेश्वर करवीर शंकराचार्य संस्थान मठाचे २२वे पीठाधीश होते. शिरोळकर स्वामींनंतर हा मठ एरंडेस्वामींनी चालवला. एरंडेस्वामी सन २०१०पर्यंत हयात होते.

या ‘शंकराचार्यांच्या मठा’ची जागा आणि वास्तू मूळची दिवेकरांची होती. जुन्या पद्धतीची ही जागा आजही २०१७ साली चांगल्या स्थितीत आहे. भर वस्तीत वर्दळीच्या मध्यभागी असला तरी ह्या मठातले वातावरण शांत आहे. मठात वेदपाठशाळा आहे. मंदार शहरकर हे घनपाठी तेथे वेद शिकवतात. जुनी वास्तू, सारवलेले अंगण, शांत पवित्र वातावरण, पांढरी शुभ्र गाय आणि तिचे वासरू ह्या पुणे शहरात दुर्मीळ झालेल्या गोष्टी या मठात आहेत.

महाराष्ट्रातील अन्य शंकराचार्य मठ[संपादन]

  • महाराष्ट्रात संकेश्वर-करवीर येथे ‘श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य संस्थान’ या नावाचा मठ आहे. या मठाचे सध्याचे (२०१७ सालचे) पीठाधीश राजाराम अनंत कुलकर्णी ऊर्फ सच्चिदानंद विद्यानरसिंह भारती स्वामी हे आहेत. त्यांचा या मठाचे पीठाधीश म्हणून १० जुलै २०१६ रोजी पीठाभिषेक झाला. राजाराम अनंत कुलकर्णी यांनी एरंडेस्वामींच्या आग्रहाखातर संन्यास घेतला आहे.


'श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ, संकेश्वर-करवीर'या पीठाबाबतची वस्तूस्थिती.


श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ, संकेश्वर-करवीर, तालुका - हुक्केरी.जिल्हा - बेळगांव या पीठाला सुमारे पाचशे वर्षांची परंपरा आहे. उपलब्ध इतिहास व दस्तावेजां नुसार हे स्वतंत्र पीठ गुरु शिष्य परंपरा संचालित आहे. तसेच ते कोणत्याहि चतुराम्नाय शंकराचार्य पीठाच्या अधिकाराखाली येत नाही.तसेच सदर पीठ हे कोणत्याहि चतुराम्नाय शंकराचार्य पीठा पेक्षां जुने हि नाही. श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ, संकेश्वर-करवीर, ता.हुक्केरी.जि.बेळगांव या पीठाचे 22 वे पीठाधिपती प.प श्री शिरोळकर स्वामी,

हे प्रसिद्ध दत्तभक्त प.प श्री वासुदेवानंद सरस्वती
( टेंब्ये स्वामी)महाराज यांचे शिष्य होते. 

संन्यास घेण्यापूर्वी प.प श्रीशिरोळकर स्वामी यांना ब्रह्मावर्त या स्थळी सन 1904 मध्ये प.प श्री वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये स्वामी) महाराज यांचा अनुग्रह झाला होता. श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ, संकेश्वर-करवीर, ता.हुक्केरी.

जि.बेळगांव या पीठाचे 21 वे पीठाधिपती प.प श्री वाईकर -शेंडे स्वामी यांनी, प.प श्री शिरोळकर स्वामी यांची श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ, 

संकेश्वर-करवीर, ता.हुक्केरी.

जि.बेळगांव या पीठावर 22 वे पीठाधिपती म्हणून  गुरु शिष्य परंपरेने अधिकृत नियुक्ती केली. प.प श्री शिरोळकर स्वामी यांनी कालांतराने एकूण पाच शिष्य केले.

प.प श्री शिरोळकर स्वामी हे 1959 साली समाधिस्त झाले. त्यानंतर त्यांच्या तीन शिष्यात म्हणजेच 1)प.प श्री जेरे स्वामी 2) प.प श्री कल्याण सेवक स्वामी 3) प.प श्री एरंडे स्वामी यांच्यात , गुरु शिष्य परंपरे प्रमाणे अधिकृत उत्तराधिकारी कोण असा वाद निर्माण होऊन,हा वाद कोर्टात अनेक वर्षे चालून, सन 1992 च्या बंगलोर हायकोर्ट अपील नंबर R.F.A No.143/1982. या निकालाने प.प श्री एरंडे स्वामी हे श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ, संकेश्वर-करवीर,ता.हुक्केरी. जि.बेळगांव या पीठाचे 23 वे पीठाधिपती गुरु शिष्य परंपरे प्रमाणे कायदेशीररित्या ठरले. प.प श्री एरंडे स्वामी यांनी त्यांच्या हयातीत कोणासही शिष्य केले नाही. प.प श्री एरंडे स्वामी हे 2010 साली समाधिस्त झाले.प.प श्री एरंडे स्वामी यांनी, त्यांच्या हयातीत नऊ व्यक्तींना श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ, संकेश्वर-करवीर, ता.हुक्केरी.जि.बेळगांव या पीठावर योग्य व्यक्ती नियुक्त करण्या बद्दल अधिकार पत्र करून दिले आहे. या अधिकार पत्रातील व्यक्तींना न विचारता परस्पर दि.9 आणि 10 जुलै 2016 रोजी , श्री. राजाराम अनंत कुलकर्णी तथा

श्री. राजाराम अग्निहोत्री तथा सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती स्वामी यांचे श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ, 

संकेश्वर-करवीर, ता.हुक्केरी.जि.बेळगांव या पीठावर आरोहण काही अनधिकारी व्यक्तींच्या गटाने घडविले आहे. या गटातील काही व्यक्ती या वर उल्लेख केलेल्या बेंगलोर हायकोर्टाच्या दाव्या मध्ये प्रतिवादी आहेत.या संबंधी, या संदर्भात प.प श्री एरंडे स्वामी यांनी केलेल्या

अधिकार पत्रातील नऊ व्यक्तीं पैंकी हयात सर्व व्यक्तींनी संकेश्वर कोर्टात OS No. 234/2016 या क्रमांकाने व हुक्केरी कोर्टात MA. No. 24/2016 या क्रमांकाने दावा दाखल करुन न्यायालयीन दाद मागितली आहे. अतः
श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ, 

संकेश्वर-करवीर, ता.हुक्केरी.

जि.बेळगांव. 

संकेश्वर-करवीर पीठ शंकराचार्य म्हणून सध्या तसे सांगणारी व्यक्ती कोर्टात दाखल केलेल्या दाव्यांचे अंतिम निकाल लागे पर्यंत अधिकृत शंकराचार्य नाही. जनसामान्य व श्री आद्य शंकराचार्य परंपरा मानणार्‍या व्यक्तींना परिस्थिती, वस्तुस्थिती कळावी , ज्ञात व्हावी हे या प्रकटनाचे प्रयोजन आहे. हे प्रकटन विद्यमान फिर्यादी द्वारा आहे. कळावे.